आपल्याभोवती रेडिएशनचं जाळं

तुम्ही मित्रांसोबत असता, तेव्हा तुमच्या मित्राच्या फोनवर कॉल करा. काही सेकंदात तुम्हाला त्यांच्या फोनची रिंग ऐकू येईल.
Mobile Radiation
Mobile Radiationsakal

- जुही चावला मेहता

मोबाईल टॉवरमधून निघणारे रेडिएशन आरोग्यावर कसे घातक परिणाम करतात, याविषयी आम्ही प्रेझेंटेशन देतो. तो एक इंटरेस्टिंग प्रयोग करतो. हा प्रयोग तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की करा...

तुम्ही मित्रांसोबत असता, तेव्हा तुमच्या मित्राच्या फोनवर कॉल करा. काही सेकंदात तुम्हाला त्यांच्या फोनची रिंग ऐकू येईल. याचा काय अर्थ होतो? तुम्ही मित्राचा नंबर डायल केल्यावर तुमच्या फोनवरून एअरवेव्ह तुमच्या जवळच्या सेल टॉवरवर जातात. जिथून टॉवर एका स्विचिंग सेंटरशी स्मार्टपणे जोडलेला असतो.

इतर लाखो फोनमधून तुमच्या मित्राचा फोन कुठे आहे, हे ओळखतो. एअरवेव्ह त्या नंबरवर शूट केले जाते आणि आपला कॉल कनेक्ट होतो. आपण एका खोलीत असल्याने या एअरवेव्ह भिंती, खिडक्या, दरवाजे यातून प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचतात.

आता तुमच्या मित्राला त्यांच्या फोनवर बसायला सांगा किंवा फोनवर झोपायला सांगा, जेणेकरून फोनचा कोणताही भाग हवेच्या संपर्कात येणार नाही. आता पुन्हा एकदा, तुमच्या मित्राचा फोन नंबर डायल करा. त्याच्या फोनची रिंग तुम्हाला ऐकू येईल. इथे नेमके काय झाले..? वर सांगितल्याप्रमाणे एअरवेव्ह या भिंती, हवा, दरवाजा, खिडक्या यांमधून जसा प्रवास करतात, त्याचप्रमाणे त्यांनी तुमच्या मित्राच्या शरीरातून प्रवास केला आणि मोबाईल फोनपर्यंत पोहोचल्या.

हे आश्चर्यकारक आहे, नाही का?

तुम्ही पिकनिकला जाताना तुमचे सॅंडविचेस ज्या ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळता, त्याच फॉईलमध्ये व्यवस्थितपणे तुमचा मोबाईल फोन गुंडाळा. लक्षात असू द्या, मोबाईल फोनचा कुठलाही भाग उघडा राहणार नाही आणि हवेच्या संपर्कात येणार नाही. आता तुम्ही तुमच्या मित्राला कॉल करण्याचा प्रयत्न करा, जे होईल ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला सांगितले जाईल, ‘तुम्ही डायल केलेला नंबर सध्या उपलब्ध नाही.’

हे कसे घडले? याचा अर्थ काय? याचा नेमका अर्थ असा आहे की रेडिएशन हे हवा, बांधकाम साहित्य, शरीरामधून प्रवास करू शकतात; परंतु धातू ही एकमेव गोष्ट आहे ज्यातून रेडिएशन जाऊ शकत नाही, ते परतवले जाते.

ध्वनी लाटा या हवेतून प्रवास करू शकतात, पाण्याने शोषल्या जाऊ शकतात; परंतु धातूच्या संपर्कात आल्यावर त्या परावर्तित होतात. या गोष्टीचा आपण नंतर विचार करू.

तुमच्यापैकी किती जणांच्या घरी मायक्रोवेव्ह आहे? जर ‘होय’ असं उत्तर तुम्ही आनंदाने देत असाल तर माझी विनंती आहे तुम्हाला, मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवल्यावर तुमच्या शरीरावर आणि अन्नावर काय परिणाम होतो, याविषयी रिसर्च करा.

तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि परिवाराची काळजी असेल तर त्वरित तो मायक्रोवेव्ह ओव्हन तुमच्या रद्दीवाल्याला विनामूल्य द्या, पण आपण मायक्रोवेव्हबद्दल का बोलत आहोत? कारण मोबाईल टेलिकम्युनिकेशनसाठी वापरले जाणारे रेडिओवेव्ह हे मायक्रोवेव्हच्या रेंजमधील आहेत आणि या वेव्हजचा वापर मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये केला जातो.

आता मायक्रोवेव्हमध्ये आग नाही, तरीही जेव्हा आपण त्यात अन्न ठेवतो, ते चालू केल्यावर आपले अन्न गरम होते.

हे कसे घडत आहे? कारण ओव्हनमध्ये एक विशिष्ट तंत्रज्ञान आहे जे विजेवर चालते आणि मायक्रोवेव्ह उत्सर्जित करते. हे मायक्रोवेव्ह अन्नपदार्थांचे रेणू बनवतात, वेगाने कंपन करतात. या वाढलेल्या कंपनाने उष्णता निर्माण होते आणि तुमचे अन्न गरम होते. रेणूंबद्दल शाळेत काय शिकवले ते आठवते का? रेणू हे सर्व पदार्थांचे सर्वात लहान एकक आहे. अगदी सोप्या भाषेत समजून घायचे असेल तर आपले अन्न म्हणजे इमारत आणि रेणू म्हणजे या इमारतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विटा.

हवेमध्ये रेणू सैलपणे उपस्थित असतात, त्यांच्या सभोवताली अधिक जागा असते, त्यामुळे ते अधिक कठोरपणे कंपित होतात आणि हवा वेगाने गरम होते. द्रव अवस्थेमध्ये रेणू थोडे अधिक जवळ असतात. रेणूंच्या सभोवताल कमी जागा असल्याने ते थोडे कमी कंपन करतात आणि त्यामुळे द्रव गरम होण्यास थोडा जास्त वेळ लागतो.

घन पदार्थांमध्ये रेणू एकमेकांच्या जवळ असतात, घट्ट बांधलेले असतात. ते तापण्यासाठी सर्वात जास्त वेळ घेतात. जेव्हा आपण मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतो तेव्हा हे समजून घेण्यासाठी विशिष्ट सूचनांचे पालन करतो :

अन्न ओव्हनमध्ये ठेवा

ओव्हनचा दरवाजा बंद करा

मायक्रोवेव्ह ओव्हन चालू करा

ओव्हनपासून दूर जा

ओव्हन बंद करा, थोडा वेळ थांबा

(जेणेकरून मायक्रोवेव्ह पूर्णपणे स्थिर होईल) आणि नंतर दरवाजा उघडा.

गर्भवती महिलांना मायक्रोवेव्ह ओव्हन न वापरण्याचा सल्ला दिला जातो? का? हे तुम्हाला माहिती आहे का?

आपण आधी पाहिले होते की या रेडिओव्हेवज शरीरातून प्रवेश करून आरपार जातात, त्यामुळे पोटातील गर्भावर याचा काय परिणाम होईल याचा विचार करा.

वास्तविक पाहता मोबाईल फोन टॉवर आणि रेडिओ वेव्हजच्या मोठ्या प्रमाणावरील वापरातून आपण एकप्रकारे खुले मायक्रोवेव्ह ओव्हन तयार केले आहे.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मोबाईल टॉवर्स २४ तास काम करत असतात. ग्राहकांच्या वापरानुसार त्यांची तीव्रता कमी-जास्त होते; पण रेडिओवेव्ह या सतत काम करत असतात. हे मोबाईल टॉवर आपल्याला रहिवाशी इमारती, शाळा, मोकळ्या जागा, हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणी उभारलेले आढळून येतात. बहुतांश लोक त्यांच्या आयुष्यातील अनेक तास घरात घालवतात. जसे आपण आधी पाहिले, आपल्या प्रयोगात रेडिओव्हेवज शरीरातून प्रवास करतात. रेडिएशन पाण्याद्वारे शोषले जाते आणि मानवी शरीरामध्ये ७० टक्के पाणी आहे.

दुर्दैवाने आपण रेडिएशन पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही किंवा वास घेऊ शकत नाही, म्हणून आपण ते विसरतो की ते तेथे आहे, पण ते आपल्या सभोवताली जाळ्यासारखे पसरलेले आहे.

रेडिएशन हे तुलनेनं नवीन आहे, ३० वर्षांपूर्वी रेडिएशनचा आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये वावरसुद्धा नव्हता. ही जरी अलीकडील घटना असली तरी त्याचे पूर्ण परिणाम जाणून घ्यायला एक कालावधी लागणार आहे.

यावर वेळेत उपाय करणे गरजेचे आहे. रेडिएशनपासून वाचण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, हे तुम्हाला पुढच्या लेखात मी नक्की सांगेन.

juhichawlaoffice@gmail.com

(शब्दांकन : नीलिमा बसाळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com