रेडिएशन... गंभीर आजारांना निमंत्रण!

गणेशोत्सवापूर्वी तुम्हाला एअरवेव्ह आपल्यापर्यंत कशा पोहोचतात हे सांगितले होते. आता या एअरवेव्हचा, रेडिएशनचा शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, हे बघू या...
radiation
radiationsakal

- जुही चावला मेहता

गणेशोत्सवापूर्वी तुम्हाला एअरवेव्ह आपल्यापर्यंत कशा पोहोचतात हे सांगितले होते. आता या एअरवेव्हचा, रेडिएशनचा शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, हे बघू या...

मागच्या लेखात आपण पाहिले की, कशा प्रकारे एअरवेव्ह भिंती, खिडक्या, दरवाजे यातून प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचतात आणि धातूच्या संपर्कात आल्यावर कशा प्रकारे त्या परतवल्या जातात. या एअरवेव्हचा, रेडिएशनचा आपल्या शरीरावर नेमका कसा परिणाम होतो, हे वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे.

मोबाईल टॉवर रेडिएशनचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम या आमच्या प्रेझेंटेशनमध्ये प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. आशीष मेहता नेहमी सांगतात की, मोबाईल फोन कॉल्सचा अतिवापर केल्याने इजा होऊ शकते. तसेच ईएमएफ रेडिएशनला दीर्घकाळ कानाजवळ ठेवल्यास मेंदूला नुकसान होऊ शकते.

यामध्ये लहान मुलांची अवस्था तर अधिकच चिंताजनक आहे, कारण त्यांचा मेंदू हा विकसनशील अवस्थेत असतो. त्यामुळे त्यांना होणारा धोका हा जास्त आहे. ‘रेडिओ लहरी आपल्या शरीरातून आरपार जाताना शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतात. आपले शरीर अतिशय प्रगत, अत्यंत जटिल, बायो इलेक्‍ट्रिक सिस्टम आहे.

हवेतील इलेक्ट्रिक सिग्नल आपल्या नर्व्हस सिस्टमद्वारे आपल्या शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागापर्यंत वाहून जातात. आपल्या शरीराचे संपूर्ण व्यवस्थापन नर्व्हस सिस्टमद्वारे केले जाते. मानवजातीच्या इतिहासात प्रथमच या नाजूक, अत्यंत गुंतागुंतीच्या; परंतु विद्युत यंत्रणेला मोबाईल टेलिफोनसारख्या मायक्रो वेव्हच्या संपर्कात आणले जात आहे,’ असे डॉ. मेहता सांगतात.

चिंतेची बाब म्हणजे याचे दुष्परिणाम लगेच जाणवणार नाहीत. अतिशय लहान लक्षणांपासून याची सुरुवात होते. थकवा, चिडचिडेपणा, तणाव, डोकेदुखी, निद्रानाश आणि कालांतराने याचे रूपांतर गंभीर आजारांमध्ये होते. अलीकडच्या काळात लहान मुलांमध्ये एडीएचडीसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढले आहे.

त्याचप्रमाणे प्रजननासंबंधित समस्याही जोडप्यांमध्ये वाढत असल्याचे आढळून आले आहे. बारकाईने विचार केल्यास गेल्या काही वर्षांत कर्करोगाचे प्रमाणदेखील वाढल्याचे लक्षात येईल, असे डॉ. आशीष मेहता यांचे म्हणणे आहे.

इंटरनेटवर शोध घेत असताना माजी रॉयल नेव्ही मायक्रोवेव्ह शास्त्रज्ञ बॅरी ट्रॉवर यांची ‘५-जी’संदर्भातील एक मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी ‘५- जी’बद्दल जे काही सांगितले, ते ऐकून मला धक्काच बसला. पटकन मनात विचार आला, हे तुम्हाला सांगितलेच पाहिजे. बॅरी ट्रॉवर यांनी लष्करात दाखल होण्यासाठी १९५९ मध्ये सूक्ष्म लहरींचा अभ्यास सुरू केला. त्यांनी आण्विक आणि अणु भौतिकशास्त्रात विशेष प्रावीण्य मिळवले आहे. हे शिक्षण घेत असताना त्यांनी मायक्रोवेव्हच्या स्केलचा सखोल अभ्यास केला.

वायरलेस तंत्रज्ञान आणि ‘५-जी’ हे शस्त्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आहे. वायरलेस तंत्रज्ञान, ‘५-जी’सह हे एक शस्त्र आहे, जे मनावर नियंत्रण, गर्दी नियंत्रण इत्यादीसाठी वापरले गेले आहे. यूके सरकारने नॉर्दर्न आयर्लंडमधील समाजगटांविरुद्ध मायक्रोवेव्हचा वापर केला. १९८० मध्ये ग्रीनहॅम कॉमन येथे क्रूझ क्षेपणास्त्रांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर अमेरिकी लोकांनी त्यांचा वापर केला.

अमेरिकन सैन्याने मायक्रोवेव्ह शस्त्रे विकसित करण्यासाठी मायक्रोवेव्ह रेडिएशनच्या प्रदर्शनाच्या जैविक परिणामांवर सोव्हिएत संशोधन पेपर गोळा करण्यात दोन दशके घालवली. सध्या हे मायक्रोवेव्ह शस्त्र सेल फोनच्या स्वरूपात प्रत्येक मुलाच्या हातात दिसत आहे.

बॅरी ट्रॉवर यांची मुलाखत डोळे उघडणारी आहे. ‘५-जी’मुळे होणाऱ्या नरसंहारापासून आपले संरक्षण अशक्य आहे. मोबाईलच्या जाळ्यामध्ये आपण सतत गुरफटले जात आहोत. त्यात ‘५-जी’मुळे हे जाळे आपल्या अवतीभोवती सतत आहे.

समाजमाध्यमांवर तुम्हाला बॅरी ट्रॉवर यांची मुलाखत ‘Claire Edwards And Barrie Trower on 5G’ ऐकता येईल. नक्की ऐका आणि तुम्हाला काय वाटते हे मला कळवा.

एखादे औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याचा परिणाम आणि दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी काही  वर्षांचा कालावधी जातो. तसेच काही कठोर चाचण्यादेखील केल्या जातात, पण इथे तर कुठल्याही दुष्परिणामांची चिंता न करता संपूर्ण मानव जातीवर रेडिएशनचे जाळे सोडण्यात येत आहे. विचार करा, या सर्वांचा आपल्या शरीरावर किती दुष्परिणाम होईल.

रात्री झोपताना मोबाईल फोन आपण उश्याखाली ठेवून झोपतो; परंतु त्यातून सतत बाहेर पडणारे रेडिएशन आपल्या शरीरावर व आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करत असतात. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असतानादेखील आपण मोबाईल वापरतोच आहोत. याविषयी तुम्हाला काय वाटते, हे मला ई-मेल करून नक्की सांगा.

juhichawlaoffice@gmail.com

(शब्दांकन : नीलिमा बसाळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com