Latest Marathi Article | दगडांच्या देशा : गारगोटीच्या माध्यमातून अपार रोजगारनिर्मिती शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

K C Pande

दगडांच्या देशा : गारगोटीच्या माध्यमातून अपार रोजगारनिर्मिती शक्य

लेखक : के. सी. पांडे

आपल्या देशातील अनेक अशा गोष्टी आहेत, की त्यांची व्यवस्थितपणे प्रस्तुती केली आणि त्याला सरकारचे पाठबळ मिळाले तर जगाच्या पटलावर आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो. गारगोटीच्या प्रवासात आम्हाला असे लक्षात आले, की यामध्ये अनेक अपार अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. मी व माझ्या मुलांनी यशस्वीरीत्या गारगोटी सांभाळली, वाढविली. याच्या विस्तारावरूनच आपल्या लक्षात येईल, की ‘स्पेस इस द लिमिट’इतकी मोठी व्याप्ती आहे. पण यासाठी सकारात्मक दृष्टिकोन दाखविणे गरजेचे आहे. भारताबरोबर महाराष्ट्रातीलही पारंपरिक वस्तूंचे प्रमोशन पाहिजे तितक्या व्यापकतेने केलेले नाही. ते झाले तर रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. (K C Pandey Saptarang Latest Marathi Article on employment generation possible through pebbles Nashik News)

अमेरिकेतील गारगोटी संग्रहालयाची सुपर्ब मिनरलचे संचालक कुलीन पांडे

अमेरिकेतील गारगोटी संग्रहालयाची सुपर्ब मिनरलचे संचालक कुलीन पांडे

गारगोटीचे खनिजे

गारगोटीचे खनिजे

निसर्ग हा अद्‍भुत आहे. त्याची किमया ही आपल्या कल्पनेच्या पलीकडील आहे. अशा अनेक गोष्टी आहे की त्या निसर्गनिर्मितच आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कितीही पुढे गेलो आहे तरी काही बाबतीत निसर्ग ही एक अंतिम शक्ती आहे. त्यावर मानवाला विजय मिळविता आलेला नाही. पृथ्वीतलावर सर्वांत हुशार मनुष्य जात आहे. जगण्याच्या व उभे राहण्याच्या महत्त्वाकांक्षेने मानवाने पृथ्वीतलावरचे स्वतःचे वर्चस्व इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत निर्विवाद सिद्ध केले आहे.

रामदेवबाबांनी योगसाधनेबद्दल जनजागृती केली. याअगोदरही अनेक वर्षांपासून योग हा माहीतच होता, पण शासनाने त्यास पाठबळ दिले व योगाला वैश्विक दर्जा प्राप्त झाला हे सध्याच्या काळातील एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून बघता येईल. अशाच प्रकारचे प्रोत्साहन सरकारकडून अपेक्षित आहे.

जमीन, आकाश, भूगर्भ, पाणी व हवा अशा पृथ्वीतलावर अनेक बाबी आहेत की ज्या फक्त निसर्गाच्या तत्त्वाप्रमाणे सुरू आहेत. त्यांचे अस्तित्व फक्त निसर्गामुळेच आहे. जमिनीखाली म्हणजेच भूगर्भाखाली निसर्गाची एक मोठी किमया आहे. आपल्या डोळ्यांना विश्वास बसणार नाही, असे सौंदर्य मिनरल दगडांची अद्‍भुत दुनिया आपणास गारगोटीच्या माध्यमातून अनुभवास मिळाली आहे. खरेतर गारगोटी मिनरलला देवाने बनविलेल्या कलाकृतीची प्रस्तुती असे म्हणता येईल.

गारगोटीच्या चाळीस वर्षांच्या प्रवासामध्ये जगभरात मिनरलला गारगोटीच्या माध्यमातून ओळख मिळाली हे खरे आहे, पण याचे श्रेय निसर्गाने घडविलेल्या या अद्‍भुत चमत्कारासच आहे. कारण जर हे निसर्गनिर्मित नसते तर जगाला बघावयास मिळाले नसते. गारगोटीची घोडदौड ही जागतिक पातळीवर सुरूच आहे. यात अजूनही काम करण्यास वाव आहे. या क्षेत्रात रोजगारनिर्मितीच्या अनेक व असंख्य संधी उपलब्ध आहेत.

गारगोटीचे अमेरिकेतील सुपर्ब मिनरल.

गारगोटीचे अमेरिकेतील सुपर्ब मिनरल.

हेही वाचा: तू चाल पुढं...

माझ्या पिढीला व सध्याच्या तरुण पिढीला गारगोटी मिनरलबद्दल काही प्रमाणात माहिती आहे, पण ही अधिक व्यापक प्रमाणात होणे गरजेचे आहे. गारगोटी मिनरल जमिनीमधून जेव्हा बाहेर काढला जातो, तेव्हा सुरवातीपासून त्याच्या उत्खननापासून तर त्याची परदेशात विक्री होईपर्यंत त्याचा भला मोठा प्रवास आहे.

यात प्रामुख्याने दगड जमिनीतून बाहेर काढणे, त्याच्या अंतरंगात गारगोटी आहे की नाही याचा अंदाज घेणे, दगड व्यवस्थित फोडल्यानंतर त्याचे नैसर्गिक सौंदर्य मूळ स्वरूपात आहे तसेच ठेवणे व त्याची काळजी घेणे, तो फुटू नये यासाठी जतन करणे, मिनरल दगडाची वाहतूक पोचविणे, त्यानंतर त्याची विक्री अशा प्रवासात असंख्य प्रकारच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

या सर्व प्रवासात प्रथम जमीन व विहिरीमध्ये खोदकाम करून मिनरल दगड बाहेर काढणारे महाराष्ट्रातील वडार समाजाचे बांधव यांचे योगदान उल्लेखनीय आहे. गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना अनेक वर्षांपासून नियमितपणे रोजगार मिळालेला आहे. हेच गारगोटीचे सर्वांत मोठे यश आहे.

खोदकाम, पर्यटन, वाहतूक, प्रस्तुती, प्रदेशातील संधी एक ना अनेक रोजगाराचे पर्याय गारगोटी मिनरल क्षेत्रात काम करीत असताना उपलब्ध आहेत. गारगोटीच्या प्रवासात गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय सिन्नर येथे स्थापन केल्यानंतर आम्ही अमेरिकेतील ॲरिझोना येथे नाशिकमधील गारगोटी संग्रहालय जसे भव्यदिव्य आहे त्याच धर्तीवर अमेरिकेत शोभेल अशा रचनेचे सुपर्ब मिनरल संग्रहालय तेथे निर्माण केले.

भारतात जशी गारगोटीला लोकप्रियता मिळाली त्यापेक्षाही किंबहुना अधिक लोकप्रियता अमेरिकेतही मिळाली. अमेरिकेतील नागरिक आपल्यापेक्षा व्यवहारात थोडा अधिक चौकस आहे. त्याला आपला फायदा लगेच समजतो. आपल्याकडेही व्यापार समजणारा काही वर्ग आहे. पण त्यात अजून वाढ होण्याची गरज आहे. अमेरिकेतून भारतातील विशेषकरून महाराष्ट्रातील गारगोटी जगभर पाठविली जाते. यास मोठ्या प्रमाणात मागणीही आहे.

पण याचा प्रचार व प्रसार अधिक व्यापकतेने होणे गरजेचे आहे. विशेषकरून शाळा व महाविद्यालयांतून भूगर्भातील सौंदर्याबद्दल माहिती दिली गेली पाहिजे. ही अशी एक दुनिया आहे तिची माहिती कमी वयात मिळाली तर विद्यार्थिदशेतच या क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडविता येईल यात मात्र शंका नाही. अमेरिकेतील गारगोटी म्युझियम बघण्यासाठी फक्त अमेरिकेतूनच नव्हे तर संपूर्ण युरोप खंडातून तसेच आफ्रिका, चायना येथूनही नागरिक नियमितपणे भेट देत असतात.

(लेखक सिन्नरस्थित आंतरराष्ट्रीय गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

बातम्या

बातम्या

हेही वाचा: गज़लच्या ब्रॅण्डची पन्नाशी!

Web Title: K C Pandey Saptarang Latest Marathi Article On Employment Generation Possible Through Pebbles Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..