Pune Rain : पाऊस आणि त्याचे अलर्टस्!

कृपादान आवळे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे अलर्ट जारी केल्याचे आपण अनेकदा वाचले असेल. आता याच अलर्टबाबतची माहिती आपण आज घेणार आहोत.

पुणे : सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. मात्र, या पावसामुळे महाराष्ट्रातील काही शहरांसह इतर राज्यातील नागरिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. मात्र, पाऊस पडण्यापूर्वी हवामान विभागाकडून अनेकदा विविध अलर्ट जारी केले जातात. यामध्ये ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड असे अलर्ट जारी केल्याचे आपण अनेकदा वाचले असेल. आता याच अलर्टबाबतची माहिती आपण आज घेणार आहोत.

ग्रीन अलर्ट : ग्रीन हा अलर्ट इतर अलर्टच्या तुलनेने कमी धोकादायक असा असतो. यामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या किंवा मध्यम प्रमाणाचा पाऊस पडण्याचा अंदाज असतो. हा अलर्ट वर्तविण्याचे प्रमाणही कमी असते.

येलो अलर्ट : हवामानाचा अंदाज घेऊन येलो अलर्ट हा काही ठराविक वेळीच दिला जातो. हा अलर्ट जारी केल्यानंतर एकप्रकारे सतर्कतेचा इशाराच दिला जातो. त्यानुसार तयारी करण्याची गरज भासते. 

ऑरेंज अलर्ट : ऑरेंज अलर्ट हा अलर्ट जारी केल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. त्यानंतर येणाऱ्या संकटाची, नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन त्यावर नियोजन, पाऊले उचलण्याची गरज असते. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेऊन हा अलर्ट जारी केला जातो.  

रेड अलर्ट : धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी केला जातो. प्रशासनाकडून ज्याप्रकारे नियोजन केले गेले. त्याप्रकारे त्याची अंमलबजावणीचीही करण्याची गरज असते. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- 'आर्थिक निकषांवर जर मराठ्यांना आरक्षण मिळाले, तर मुस्लिमांना का नाही?' : ओवेसी

- Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांची अचानक संघाच्या गणवेशात एन्ट्री

- Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये मंगळवारी 'राज वादळ'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know more about Rain and their Alerts