मजा-मस्तीत केले काम

kriti and diljit
kriti and diljit

जोडी पडद्यावरची - क्रीती सेनॉन आणि दिलजित दोसांज
अभिनेत्री क्रीती सेनॉन हिंदी चित्रपटसृष्टीत ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘हिरोपंती'' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आली. तर, पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज त्याच्या अनेक पंजाबी आणि हिंदी गाण्यांसाठी ओळखला जातो. तसेच, तो ‘उडता पंजाब’, ‘फिलौरी’, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’सारख्या हिंदी चित्रपटांत झळकला आहे. क्रीती आणि दिलजित हे ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या दोघांचीही पहिल्यांदा एका मुलाखतीदरम्यान भेट झाली. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारलं असता दिलजित म्हणाला, ‘‘क्रीतीचा ‘दिलवाले’ या चित्रपटादरम्यान मी तिची मुलाखत घेतली होती. त्या वेळी या मुलाखतीव्यक्तिरिक्त आमचं काही विशेष बोलणं झाले नाही. मात्र, मी क्रीतीचे ‘बरेली की बर्फी'', ‘लुका छुपी'' यांसारखे चित्रपट पाहिल्यानं मला तिचं काम माहीत होतं. त्यानंतर ‘अर्जुन पटियाला'' चित्रपटासाठी पहिल्यांदाच भेट झाली.’’

दिलजित आणि क्रीती दोघंही पंजाबी आहेत. क्रीतीला पंजाबी कळतं; पण बोलता येत नाही. त्या दोघांतल्या संभाषणात दिलजित पंजाबीमध्ये बोलतो, तर क्रीती हिंदीमध्येच बोलते. क्रीतीला पंजाबी भाषेविषयी विचारलं असता ती म्हणाली, ‘‘मला पंजाबी बोलता येत नसलं, तरी पंजाबी भाषा मला चांगली कळते आणि मला माझ्या भाषेवर फार प्रेम आहे.’’ एकमेकांच्या स्वभावाविषयी सांगताना, दिलजित म्हणतो, ‘‘क्रीतीला मी फार कमी काळापासून ओळखतो. आमची ओळख चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली. पण, ती खूप गोड आहे. ती नेहमीच सकारात्मक विचार करते.

तिच्यासोबत काम करताना मला खूप मजा येते.’’ दिलजितबाबत क्रीती म्हणते, ‘‘मला दिलजीसोबत काम करताना मजा येते. तो खूप मस्तीखोर आहे आणि नेहमीच कॉमेडी करीत असतो.’’ सेटवरील मजा-मस्तीबद्दल विचारलं असता क्रीती म्हणते, ‘‘हा चित्रपट कॉमेडी असल्यानं सेटवरील वातावरणदेखील नेहमीच मस्तीचं असायचं. चित्रीकरण करताना आम्ही खूपच मस्ती करायचो.’’ 

कॉमेडी चित्रपटांबद्दल विचारले असता क्रीती म्हणाली, ‘‘मी याआधीही काही चित्रपटांत कॉमेडी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळं या चित्रपटात काम करणं मला अधिकच सोपं गेलं. कॉमेडी भूमिका असल्यास मी आवर्जून स्वीकारते.’’ यावर दिलजित म्हणतो, ‘‘मला कॉमेडी चित्रपट करायला आवडतात. त्यामुळं या चित्रपटातील कोणताही सीन करताना मला फारसं कठीण गेलं नाही. या चित्रपटातदेखील मी स्क्रिप्ट नीट समजून घेऊन आणि मजा-मस्तीत काम केलं आहे.’’ 

क्रीती व दिलजित दोघंही अनुभवी आहेतच, तसेच नव्या पिढीचे कलाकार असल्यानं त्यांच्यात चांगलं ट्युनिंग जमून आलं. या चित्रपटामुळं त्यांची चांगली मैत्री झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com