
Marathi Books
esakal
स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भ-वऱ्हाडातील उंबरखेड नावाच्या छोट्या गावात राहणाऱ्या सदाशिवभट काळे नावाच्या गृहस्थाच्या कुटुंबातील कथानक या कादंबरीत उलगडण्यात आलं आहे. कुटुंबातील एकनाथ नावाचा सर्वांत धाकटा मुलगा चारचौघांसारखा एकाच पठडीत विचार करणारा नसतो. वडिलोपार्जित उद्योग सोडून तो नवी वाट धरतो. शिक्षणासाठी संघर्ष करतो. त्यातच राष्ट्रहितासाठी आणि हिंदुधर्माच्या रक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार करतो आणि राष्ट्र व धर्मरक्षणासाठी सातत्याने धगधगत असलेल्या यज्ञकुंडात स्वतःच्या जीवनाची आणखी एक ‘समिधा’ वाहतो. उदय जोशी यांनी या कादंबरीचे लेखन केले आहे.
प्रकाशन : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे
पृष्ठे : २४० मूल्य : ३०० रु.