भाजपला लोकसभा निवडणुक अवघडच !

भाजपला लोकसभा निवडणुक अवघडच !

2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवताना निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत स्पष्ट बहुमत मिळवले होते. परंतु, भाजपसाठी 2019ची लोकसभा निवडणुक निश्चीतच सोपी नाही. देशातील सध्याची राजकीय परिस्थिती मात्र भाजपसाठी पोषक आहे का? हा खरा प्रश्न आहे. 2014 च्या निवडणुकात भाजपला देशात 31 टक्के मतं मिळाली होती. तर, 69 टक्के मतं ही विरोधीपक्षांमध्ये विभागली होती. पण, आत्ताची राजकीय परिस्थिती 2014च्या तुलनेत पूर्णता वेगळी आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, पंजाब, आसाम, जम्मू काश्मीर आणि दिल्लीमध्ये भाजपला 226 जागांपैकी 146 जागांवर विजय मिळाला होता. तर, 31 जागा मित्र पक्षांना मिळाल्या होत्या. पण, सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपविरोधात जवळपास या सर्व राज्यामध्ये विरोधकांची आघाडी आहे. तसेच या राज्यात जनतेच्या सरकार विरोधी असलेल्या रोषालाही भाजपला सामोरे जावे लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये तर भाजपला 80 जागांपैकी 71 जागी विजय मिळाला होता. तर, मित्र पक्षांना 2 जागा जिंकता आल्या होत्या. पण आता उत्तर प्रदेशमध्ये सप आणि बसपची आघाडी झाली असल्याने भाजपला मोठं आव्हान मिळाले आहे. त्याचबरोबर, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगममध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचा फटकादेखील भाजपला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तीन राज्यातील बहुतांश जागा या भाजपने जिंकल्या होत्या. राजस्थानमध्ये तर भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. परंतु आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुक निकालावरून हे स्पष्ट आहे की, भाजपला ही निवडणुक सोपी नाही. त्याचबरोबर ज्या सोशल मिडीयाचा वापर 2014 च्या निवडणुकात भाजपने केलेला पाहायला मिळाला आज तोच सोशल मिडिया भाजपच्या विरोधात उभा राहिलेला पहायला मिळत आहे.

2014 साली महागाई, भ्रष्टाचार या मुद्यांवर भाजपनं सत्ताधरी काँग्रेस विरोधात निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्याही. पण, 2019मध्ये मात्र भाजपला पाच वर्षाचा हिशेब द्यावा लागणार आहे. परिणामी, लोकांची नाराजीचा सामनाही करावा लागणार आहे. आता उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये कमी होणाऱ्या जागा भाजप कुठल्या राज्यातून भरून काढणार आणि त्याचा सरकार टिकवायला फायदा होणार की नाही हे पाहणे खरे औत्सुक्याचे आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com