gautam gambhir
sakal
भारतीय संघ पुढची कसोटी मालिका ऑगस्ट महिन्यात म्हणजे तब्बल नऊ महिन्यांनंतर तिही श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे कसोटी संघात किंवा संघरचनेत बदल करायचा म्हटला तरी नऊ महिन्यांचा हा काळ फार मोठा आहे. नऊ महिन्यांनंतरची परिस्थिती काय असेल, कोणता फलंदाज फॉर्मात असेल, हे सांगता येणार नाही. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे ओढवलेल्या नामुष्कीला जबाबदार कोण..? तर कोणीच नसेल.