file photo
file photo

मधुमेहामध्ये पायांची काळजी

नारदमुनी : डॉक्‍टर साहेब, मधुमेह आणि पाय व न्यूरोपॅथीवर बोलूया.
डॉक्‍टर : मधुमेहींना होणारे पायाचे 85% amputation लोकांना जागरूक करून व early intervention करून टाळू शकतो. त्यामुळे न्यूरोपॅथीबद्दलचे गैरसमज दूर करणे आवश्‍यक आहे. याविषयी अनेक समज, गैरसमज आहेत.
अनियंत्रित शुगर व खूप वर्षांपासून असलेल्या मधुमेहात पायाच्या नसांवर परिणाम झाल्यामुळे पायातील sensation कमी होतात, पाय dry होतात, पायात bony changes होतात व कधी कधी अशा high risk diabetic foot चा आकार बदलतो, तसेच काही कारणांमुळे जसे पायाच्या सर्जरीनंतर shape बदलला असेल, तर स्पेशल customized shoe तयार करून घ्यावा लागतो. म्हणजे सगळ्यांनाच स्पेशल डायबिटीज shoes ची गरज नसते. सामान्यत: broad tip, good cushion, flat platform व proper size चे आणि पायाला comfortable वाटणारे shoes मधुमेहींसाठी सुरक्षित राहतात. फक्त नवीन जोडे घेतल्यानंतर सतत तो एकच एक जोडा घालू नये, असे केल्याने shoe bite ची रिस्क वाढते. म्हणजे नवीन शू प्रथम काही दिवस कमी वेळ 2-3 तासांसाठी घालायला हवा.
डायबिटीक न्यूरोपॅथी असल्यावर हवाई चप्पल सतत घातल्याने पायांच्या अंगठ्यावर व दुसऱ्या बोटावर फार pressure येते आणि पायाला deformity व्हायची रिस्क वाढते. म्हणून मधुमेहींनी हवाई चप्पल घालायला नको. अशी सॅंडल ज्याने पायाला तिन्ही बाजूंनी support मिळेल व पायाच्या अंगठ्यांना हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल आणि जिचा cushion चांगला असेल, तीच सर्वोत्तम चप्पल म्हणू शकतो.
पायाला न्यूरोपॅथी व vasculopathy किंवा दोन्ही कारणांमुळे त्रास होऊ शकतो. vasculopathy म्हणजे पायांच्या रक्तवाहिनीचे blockage यामुळे पायाचा रक्तप्रवाह कमी होतो आणि gangrene होऊ शकतो. पायाला होणाऱ्या प्रत्येक जखमेमुळे gangrene होईलच असे नाही. पायाचा gangrene म ोठ्या रक्तवाहिनींमध्ये असलेल्या clot म्हणजे रक्ताचा थक्कानी झाल्यावर साधारणत: ''Dry gangrene'' होतो, पण पायांत इन्फेक्‍शन झाल्याने सूक्ष्म रक्तवाहिनी जर खराब झाली तर पायाच्या toes ला gangrene होऊ शकतो म्हणजे ''wet gangrene'' कधी कधी इन्फेक्‍शन झाल्याने toes वर superficial gangrene होतो (only skin is affected and deep tissue is preserved) तेव्हा फक्त वरची स्किन कापल्यानंतर नवीन स्किन येऊ शकते व toes कापायची गरज नसते.
मधुमेहामध्ये शरीराची immunity (प्रतिरोधक क्षमता) कमी होते. पायांचे इन्फेक्‍शन जास्त common असले तरी पण कुठेही फोड/इन्फेक्‍शन होऊ शकतात. उदा. जननेंद्रियामध्ये (Genital Fungal Infection), Boils on scalp (head) Eyelids चे इन्फेक्‍शन, हाताला (Palmer Abscess), Gluteal abscess, Carbuncles etc. होऊ शकतात.
पायाच्या मोठ्या रक्तवाहिन्या block झाल्या आणि त्या ब्लॉकेजला angioplasty किंवा पायाची bypass सर्जरीने correct केले नाही तर रक्त पातळ करणारी औषधे घ्यावी लागतात. औषधांचा जर पूर्णपणे असर झाला नाही, तर हळूहळू पायातून gangrene वरती येतो व अंगठ्यानंतर पाय कापावा लागतो. हे टाळण्यासाठी ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल व ब्लडप्रेशर कंट्रोल करणे जरूरी असते. तसेच काही vasodilators and antiplatelet (Blood thinner drug) चा पण उपयोग करावा लागतो.
हातातील रक्तवाहिनी जर ब्लॉक झाली तर gangrene हाताला पण होऊ शकतो.
बाजारात Diabetic foot cream सारखे पुष्कळ ointment मिळतात, पण त्यांनी न्यूरोपॅथी बरी होत नाही. Dry skin साठी कोणतेही moisturizer किंवा तेल लावले तर न्यूरोपॅथी related crack किंवा dryness टाळता येतो. पायाला होणारी आग (burning feet) साठी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने वापरू शकतात. कोणत्याही क्रीमने फक्त symptoms कमी होतात, आजार बरा होत नाही.
न्यूरोपॅथीमध्ये, पायाच्या nerves वर हाय शुगरचा परिणाम होतो. Acute neuropathy चे pain कमी व्हायला 3-6 आठवडे लागू शकतात.
Long standing duration चा डायबिटीज असल्याने होणाऱ्या न्यूरोपॅथीमध्ये Pregabalin, Gabapentin, Amitryptlin, Duloxetin इत्यादी औषधे चिकित्सक लिहितात. ही सगळी औषधे symptomatic relief देतात. Partial recovery होऊ शकते, पण पूर्णपणे मृत झालेली nerve परत नॉर्मल होऊ शकत नाही. अशा मधुमेहींना symptomatic treatment वरच अवलंबून राहावे लागते.
Varicose veins झाल्यावर पायाची धमनी (Artery) पण ब्लॉक होईल असे नाही. Varicose veins गॅंगरीन होत नाही. कधी कधी Varicose veins आणि Peripheral Artery Disease (PAD) सोबत राहू शकतात. चालताना काही distance चालल्यानंतर पायातील calf pain, coldness in feet, black discolouration of toes or feet etc सगळी PAD व Early gangrene ची लक्षणे आहेत. कधी कधी रात्री पाय दुखतात, (Nocturnal pain in legs and Feet) ही न्यूरोपॅथीची लक्षणे असतात blockage नाही.
डायबिटीक न्यूरोपॅथी व peripheral Arterial Disease यांना नियमित शुगर कंट्रोल, कोलेस्टेरॉल व ब्लडप्रेशर कंट्रोलने, धूम्रपान/तंबाखूपासून दूर राहून, नियमित व्यायाम करून टाळता येते. तसेच वर्षात एकदा पायांची नस व धमनीची तपासणी करणे आवश्‍यक असते. सुरुवातीलाच हे निदान झाले तर औषधांनी पुढील damage टाळता येते. Biothesiometer व Arterial Doppler Study ने early disease ची माहिती होऊ शकते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com