
डॉ.जयंत नारळीकर
esakal
पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव : मागे वळून पाहताना
लेखक : डॉ.जयंत नारळीकर
प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ७२ मूल्य : १२० रुपये
जगातील बहुतेक गोष्टींमागे विज्ञान दडलेले आहे, पण हा विषय म्हणजे काही तरी गहन, अवघड व डोक्यावरून जाणारा आहे असा अनेकांचा समज असतो. हा समज दूर करून जनसामान्यांना मनोरंजक आणि मनोवेधक पद्धतीने विज्ञान समजावून देण्याचे आव्हान जागतिक कीर्तिचे खगोलशास्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी पेलले. एवढेच नाही तर, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मनोरंजक माहिती आपली मातृभाषा मराठीतून देण्याचे उद्दिष्ट गाठले. नारळीकर यांची विज्ञानावरील गाजलेली व्याख्याने, त्यांचे शिक्षण, कुटुंबातून मिळालेला वारसा ही पार्श्वभूमी व आठवणींना ‘मागे वळून पाहताना’ या पुस्तकातून उजाळा मिळाला आहे.