Male Female Friendship : असावी अशी एखादी तरी मैत्रीण...

Male-Female Friendship and College Life : कल्याणसारख्या निमशहरातून मुंबईतील रुईया कॉलेजमध्ये आलेल्या तरुणाचा न्यूनगंड, बदललेले विचार आणि एका खास मैत्रिणीमुळे स्त्री-पुरुषांच्या मैत्रीकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन यांची ही गोष्ट.
Male-Female Friendship and College Life

Male-Female Friendship and College Life

esakal

Updated on: 

प्रणव सखदेव

निमशहरातून मुंबईच्या कॉलेजमध्ये गेलेला मी सुरुवातीला जरा अवघडलेला, न्यूनगंडग्रस्तच होतो. कारण वाचन, संगीत ऐकणं, चित्रपट, चर्चा करणं - अशा सर्वच बाबतींत माझ्या कॉलेजातली माझ्याच वयाची मुलं खूप वेगळ्या पातळीवर होती.

कॉलेजच्या वयात, मुलाला म्हणजे पुरुषाला एक तरी चांगली मैत्रीण असली पाहिजे,’ ऑफिसच्या कँटिनमध्ये रिलेशनशिप्सवर गप्पा चालू असताना मी हे मत ठामपणे मांडलं. मग त्याला पुस्ती जोडली, ‘एकवेळ चांगली बायको अथवा पार्टनर भेटो न भेटो, पण चांगली मैत्रीण पाहिजेच. तशी मैत्रीण असेल तर कदाचित चांगला पार्टनर भेटण्याची दाट शक्यता असते.’

त्यानंतर बराच वेळ मी त्या वाक्याचा विचार करत राहिलो... आणि मन आपोआपच कॉलेजच्या दिवसांमध्ये गेलं. मी कल्याण या तालुकावजा शहरातून मुंबई म्हणजे मेट्रोसिटीतल्या, टॉप समजल्या जाणाऱ्या रुईया कॉलेजामध्ये जेव्हा प्रवेश घेतला, तेव्हा खूप बुजरा, पारंपरिक चौकटीत वाढलेला मुलगा होतो. शाळेमध्ये, क्लासेसमध्ये किंवा आजूबाजूला, घरात पाहिलेल्या स्त्री-पुरुषांमधली नाती तशी म्हणायची तर ‘टिपिकल’च होती. नाही म्हणायला वातावरण मोकळं व्हायला लागलं होतं, पण कल्याणात ते वारे पोचून पचायला वेळ लागत होता. स्त्री-पुरुषांमध्ये निखळ मैत्री होऊ शकत नाही, असं वाक्य तर मी अनेकदा ऐकायचो. पण रुईयामध्ये गेल्यावर भेटलेल्या मैत्रिणींनी, त्यातही खास एका मैत्रिणीमुळे माझा हा समज पार बदलून गेला. गळून पडला!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com