परदेशांत पोचले क्रोशाचे काम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

घरच्या घरी - मृणाल महाबळेश्‍वरकर
विणकाम कलेच्या छंदातून आकाराला आलेल्या व्यवसायाची सुरवात १९९५ पासून झाली. क्रोशाच्या छोट्या स्वेटरने याला सुरवात केली. पहिल्यांदा घरातच पुतणी व भाची यांना स्वेटर करून दिले. ते शेजाऱ्यांनी पाहिले व करून देण्याची विनंती केली. ओळखीच्या व नातेवाइकांकडून मागणी यायला सुरवात झाली. मागणी वाढत गेली म्हणून वेगवेगळ्या वस्तू बनवण्यास सुरवात केली. त्यामध्ये तोरण, मोठ्या बाहुल्या, साध्या मोजड्या, सोलच्या मोजड्या, फुलांची परडी, कासव, रुखवतावरचे सर्व पदार्थासहित केळीचे पान, स्टॉल, शॉल, टोप्या, स्कार्फ व नेटिंग मशिनवरचे लोकरीचे बेबीसेट, मोठे स्वेटर्स, शॉल, स्टोल, मुलींचे टॉप्स, श्रग, पोंचो, फ्रॉक, नवजात बाळापासून ते आजोबांपर्यंत सर्व प्रकारचे स्वेटर्स बनवून देते. अशा प्रकारे वस्तू बनवण्याचा हातखंड मिळवला. या वस्तू बनवत असतानाच छोट्यामोठ्या प्रदर्शनात सहभाग घेतला. 

महापालिका बचत गट, भीमथडी जत्रा, मुंबईचे आम्ही उद्योगीनीच्या सहभागातून दुबई, हरियाना येथे सहभाग घेतला. बंगळूर, अहमदाबाद येथेही प्रदर्शने केली. हा संपूर्ण व्याप बघता बघता एवढा वाढला, की हाताखाली चार महिला प्रशिक्षण देऊन मदतीला घेतल्या. व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी मदर इंडिया क्रोचेट किंग या संस्थेमार्फत झालेल्या विणकाम विश्‍वविक्रमात भाग घेतला. पहिला सहभाग जानेवारी २०१६ मध्ये क्रोचेट ब्लॅंकेट बनविले ते ११,१४८,५ मीटर इतके मोठे तयार केले व त्याची विश्‍वविक्रमात नोंद झाली.

गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली. दुसरे स्कार्प, तिसरे फ्लॉवर आणि फळभाज्या तसेच ख्रिसमस गुडीज असे सहभाग घेत चार गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेटस मिळवले. अहमदाबाद येथे मिलिटरी जवानांसाठी स्कार्फ व टोप्या बनवून दिल्या. आता नोव्हेंबरमध्ये काश्‍मीरच्या जवानांसाठीही देणार आहे. मला या व्यवसायाचे बीज आईकडून मिळाले आता हा व्यवसाय घरातील सर्वांच्या मदतीने पाठिंब्याने बहरत गेला आहे. या वस्तूंना कॅनडा, अमेरिका येथूनसुद्धा मागणी आहे. घर सांभाळून कला, छंदातून जोपासलेल्या कलेचे रूपांतर ‘मृणाल वुलन्स’ या नावाने नावारूपाला आले. व्यवसाय बहरत गेला व कष्टाचे चीज झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunal mahabaleshwarkar maitrin supplement sakal pune today