Vegetarian Restaurant
Vegetarian Restaurant Sakal

तीन दशकांचा सेवाभाव

उत्तर भारतीय पदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉरंटमधील मेन्यूमध्ये असंख्य पदार्थ असतात. हटके नाव असलेलं काहीतरी खावं म्हणून दोन-तीन वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर केल्या जातात, मात्र अनेकदा पदार्थ टेबलवर आल्यावर लक्षात येतं की एकाच ग्रेव्हीमध्ये वेगवेगळ्या भाज्या परतवल्या आहेत.
Published on

प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com

उत्तर भारतीय पदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉरंटमधील मेन्यूमध्ये असंख्य पदार्थ असतात. हटके नाव असलेलं काहीतरी खावं म्हणून दोन-तीन वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर केल्या जातात, मात्र अनेकदा पदार्थ टेबलवर आल्यावर लक्षात येतं की एकाच ग्रेव्हीमध्ये वेगवेगळ्या भाज्या परतवल्या आहेत. त्यात भाज्या कमी आणि मसाल्यांचा माराच जास्त असतो. शिवाय रोटीसोबत त्या भाज्या खाऊन झाल्यावर पोट गच्च होऊन जातं. वाशी येथील नानक कृपा रेस्टॉरंट याला अपवाद आहे. इथे प्रत्येक भाजीचा मसाला, तडका आणि रंग-रूप-चव भिन्न आहे. घरात तयार होणारी पदराची चपाती, तळलेल्या कांद्याच्या तडक्याची डाळ, तोंडात विरघळणारे गरमागरम गुलाबजाम असे एक ना अनेक पदार्थ इथली खासियत म्हणता येतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर भारतीय रेस्टॉरंट असूनही नानक कृपा पूर्णत: शाकाहारी रेस्टॉरंट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com