माणूस ...

त्या दिशी राधा मावशी भल्या पहाट पहाट पुतळीकडं आल्ती... तिजा पोरगा दवाखान्यात ॲडमिट हुता...
Farmer
FarmerSakal

त्या दिशी राधा मावशी भल्या पहाट पहाट पुतळीकडं आल्ती... तिजा पोरगा दवाखान्यात ॲडमिट हुता...

अक्ख गाव धुक्यात मावळलं हुत... माणसं लगबगीन उठून आपल्या वाटला लागली हुती पण राधेच्या डोळ्यात मात्र सगळं धुकंच दाटलं हुत...तिजा पोरगा जगलं का मरलं हे माहीत नव्हतं...ती पुतळीला सगळी हकीकत सांगत हुती... तिज्या पोराला दोन पोर... चांगली शिकल्या सावरल्याली...बापाच कळलं आणि बारका तातडीन गावाकडं आला हुता.. रोज दिवस- रात बापापाशी दवाखान्यातच हुती...

बापाला नुसती त्या काचंतनं बघून डॉक्टरला इचारत हुती काय झालंय ह्यास्नी, आनं कवा बरं हुनार..पण डॉक्टर सुद्धा आम्ही सगळं करून बगतुय असं सांगून दिवस वाढवीत हुत... दिवस वाढलं की बिल बी वाढतच की... लाखाचं दीड लाख अन दोन लाख कवा झाल्याल कळत न्हाय...

कोर्टात आन् दवाखान्यात माणसाचा साठ्वल्याला सगळं पैसा खरंच झाला तरी काय हुतं न्हाय म्हणत्यात...दोन लाख बिल भरल्यावर बारक्या पोराची बायकू म्हणली...बाप वाचनार नसलं तर कशाला एवढं पैसे घालीवताय... उद्या आपल्या पोरा बाळाचं काय? तिज्या माहेरची माणसं सुद्धा फोन करून सरळ न्हाय, पण आडवळणान हेच सगळं सांगत हुती... घरात याच्यावर मिटिंग बसली.. राधा मावशी सुदा हुतीच... मोठा पोरगा म्हणला,‘ जन्माची कमाई गिली तरी बाप वाचीवणार मी...’ बारका म्हणला, ‘कमाई संपल्यावर बाप वाचवून तरी करणार काय हायस .. उद्या कर्ज झालं तर फेडायचं कस...?’

त्यो म्हणला, ‘त्यो माझं मी बघीन पण पैशामुळं माणूस न्हाय गेला पायजे...’ बारका म्हणला, मग दे तू पैस, आता माझं पैस संपलं... मोठ्यानं शेतीचा एक तुकडा काढला आनं पैसं भरलं... बापानंच कसल्यालं हुत. आपलं हुतं तरी काय...देवाच्या दयेन बाप बरा झाला... बरं हून आल्या आल्या जमिनीच्या वाटण्या झाल्या.. समदी जमीन आनं घर बापानं थोरल्याच्या नावावर केलं...

भांडण हाणामाऱ्या, व्हायची येळ आली, तसा थोरला समजूतदार हुता म्हणाला, ‘द्या त्यला समदं आम्हला चार भिती असल्या तरी एखाद्या वावरात करून खाऊ ’ पण बापानं त्यज आयकल न्हाय... त्याला माझ्या परिस पैसा पायजे तर घिवून बस म्हणावं असं म्हणून म्हातार चिडल हुत.. त्यज पुढं कुणाचं काय चाललं न्हाय...

बारका शहरातल्या कंपनीत कामाला हुता बायकू सुदा तिथलीच किली हुती... थोरला शिकूनसुदा गावाकडं शिती बघत हुता... बायकुबी वावरात राबणारी साधीच हुती त्यजी... आता बारक्यान बायकूच्या माहेरच्या माणसासानी हाताशी धरून केस ठोकल्या मोठ्यावर... जमीन आन घरातला वाटा पायजे म्हणून.. गेल्या पाच वर्षात कोर्ट कचेरीत साठवेल सगळं पैस संपलं आनं आता चार लाखाचं कर्ज झालय म्हण...! बायकू सोडून गिली ती आणखी दुसरीच गोष्ट...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com