दोस्ता, तू दुसऱ्या जातीचा आहेस !

‘अ य नित्या लका तू दुसऱ्या जातीचा आहेस होय? इतक्या दिवस तर तू मला माझ्या जातीचा वाटत होतास?’...
castism
castism sakal
Summary

‘अ य नित्या लका तू दुसऱ्या जातीचा आहेस होय? इतक्या दिवस तर तू मला माझ्या जातीचा वाटत होतास?’...

‘अ य नित्या लका तू दुसऱ्या जातीचा आहेस होय? इतक्या दिवस तर तू मला माझ्या जातीचा वाटत होतास?’ त्याच्या आवाजातच आश्चर्याचा धक्का होता. वीस वर्षांनी त्यानं फोन केला आणि असा प्रश्न विचारला. मी आवंढा गिळत फक्त त्याचं बोलणं ऐकत होतो.कॉलेजमध्ये असताना मला एक मित्र भेटलेला. करमाळ्याचा होता. तीन वर्षे आम्ही एकाच खोलीत राहत होतो. आमची मेसही एकच होती. जेवणही एकाच डब्यात करायचो. कधी मधी एकमेकांचे कपडेही घालायचो. सोबत पिक्चरला जाणं. फर्ग्युसन रोडला फिरायला जाणं, सिंहगडावर ट्रिपला जाणं सगळं व्हायचं. पण, त्याला माझी जात माहिती नव्हती अन् मलाही त्याची जात माहिती नव्हती. कारण त्यावेळी सोशल मीडिया नावाची जातव्यवस्था ठळक करणारं माध्यमच नव्हतं. जातीचे ग्रुप नव्हते वा कुठले पेजेसही नव्हते. सगळेच सारखे होते.

कॉलेज संपलं आणि आमचे मार्ग बदलले. मी नोकरीनिमित्त मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद असा प्रवास करून पुण्यात स्थायिक झालो. तोही कामानिमित्त नागपूर, नाशिक, सोलापूर प्रवास करून करमाळ्याला स्थायिक झाला. वीस वर्षात आमचे जास्तीत जास्त दहा बारा फोन झाले असतील. पण काल आलेला फोन जातीचं तुणतुणं वाजवणारा होता. तो बोलू लागला, ‘‘अरे, तुझ्या थोरात आडनावावरुन मी तुला मराठा समजत होतो. तुझी सोंग कादंबरी वाचली तेव्हा वाटलं तू लोहाराचा असशील. पेटलेलं मोरपीस कादंबरी वाचली तेव्हा वाटलं तुझी जात कोळी असेल. गुढीपाडव्याला तुझी खंडोबा कादंबरी आली तेव्हा वाटलं तू धनगराचा आहेस.

पण, काल तू फेसबुकवर जेव्हा जातीचं पेज लाईक केलं तेव्हा कळालं की तू तर दुसऱ्याच जातीचा आहेस. इतके दिवस तर तू मला माझ्या जातीचा वाटत होतास.’’ वीस वर्षांत त्याच्यासोबत दहाच वेळा बोललो असेल, पण आमच्यातल्या मैत्रीतला ओलावा कायम होता. फेसबुकवर मी कुठल्या तरी जातीचं पेज लाईक केलं आणि एका क्षणात जीवाभावाच्या मित्राच्या आवाजातला कोरडेपणा स्पष्ट जाणवू लागला होता. इतके दिवस तो मी त्याचा फक्त मित्र होतो, आता दुसऱ्या जातीतला मित्र झालो होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com