वेड ॲडव्हेंचर राइडचे!

भारताच्या विविधतेने नटलेल्या भूमीतून साहसी प्रवासाचा रोमांच अनुभवण्यासाठी ॲडव्हेंचर बाईक हे स्वप्नवत साधन ठरत आहे.
Adventure Bikes
Adventure Bikes Sakal
Updated on

अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com

भारताची भूरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकीकडे हिमालयाची पर्वतरांग, तर दुसरीकडे राजस्थानचा वाळवंट. अशा आव्हानात्मक ठिकाणी जाणे आणि तेही स्वत:च्या बाइकने हा एक रोमांचकारी आणि अविस्मरणीय क्षण ठरू शकतो. हा क्षण प्रत्यक्षात उतरविण्याचे काम वाहन कंपन्यांच्या ॲडव्हेंचर श्रेणीतील बाइक करतात. दणकट साच्यातून तयार झालेल्या ॲडव्हेंचर बाइक या सामान्य गाड्यांच्या तुलनेत अधिक बळकट असतात. ॲडव्हेंचर राइडचे वेड केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहावयास मिळते. यात हौशी आणि साहसी बाइकस्वार सहभागी होतात...

ॲडव्हेंचर किंवा ऑफ राइड बाइक प्रामुख्याने खडतर भागातील प्रवास डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येते. कारण सामान्य वाहनांच्या मदतीने खडकाळ भागातून प्रवास करणे अशक्य असते. हेड लॅम्पचा प्रखर उजेड, खाचखळगे पार करणारे टायर, चांगला ग्राउंड क्लिअरन्स, दमदार इंजिन या जोरावर पर्वतरांगा, वाळवंट आणि दलदलीतून ‘ऑफ रोड बाइक’ सहजपणे चालवता येते. आडवळणाचा प्रवास हा सुखदायक करण्याबरोबरच रोमहर्षक करण्याची किमया ॲडव्हेंचर बाइक साधतात. अलीकडच्या काळात भारतात ऑफ रोड बायकिंग लोकप्रिय होत असून, अनेक ठिकाणी ऑफ रोडिंग क्लब आणि संस्था नियमितरूपाने लाँग ऑफ राइड आणि इव्हेंट आयोजित करतात. हौशी बाइकस्वार ऑफ रोड राइडमध्ये सहभागी होत साहसी प्रवासाचा अनुभव घेतात. अर्थात, ‘ऑफ रोडिंग’ करताना सुरक्षा पाहिली पाहिजे. हेल्मेटबरोबरच अन्य सेफ्टी उपकरणांचा वापरदेखील करायला हवा. याआधारे साहसी प्रवासाचा आनंद तुम्ही मनमुरादपणे घेऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com