ओमिक्रॉन व्हेरिएंट सावध पावले गरजेची

नैसर्गिक किंवा लस-प्राप्त प्रतिकारशक्तीपासून बचाव करण्यासाठी व्हायरस कसे बदलतात,
ओमिक्रॉन व्हेरिएंट सावध पावले गरजेची
ओमिक्रॉन व्हेरिएंट सावध पावले गरजेची sakal

कोविड जगभर पसरत असताना, त्याचे म्युटेशन होत आहे, दुसऱ्या शब्दांत ते आनुवंशिक बदल घडवून आणत आहे. ‘व्हायरल म्युटेशन’ची कल्पना संबंधित वाटू शकते, परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की यापैकी बरेच म्युटेशन किरकोळ आहेत आणि विषाणू किती वेगाने पसरतो किंवा विषाणू संसर्ग किती गंभीर असू शकतो, यावर एकंदर प्रभाव पडत नाही. खरं तर, काही म्युटेशन व्हायरस कमी संसर्गजन्य बनवू शकतात.

नैसर्गिक किंवा लस-प्राप्त प्रतिकारशक्तीपासून बचाव करण्यासाठी व्हायरस कसे बदलतात, याबद्दलचे आपले बरेचसे ज्ञान इन्फ्लूएंझा विषाणूचे निरीक्षण करणे आणि इन्फ्लूएंझा लशी सतत अपडेट केल्याने येते. इन्फ्लूएंझा विषाणू दोन मुख्य मार्गांनी बदलतात, १) अँटिजेनिक ड्रीफ्ट २) अँटिजेनिक शिफ्ट. कोरोना व्हायरस आणि फ्लू विषाणूंमधील समानता आणि फरकांची तुलना आपल्याला हे समजण्यास मदत करू शकते, की त्या समानता आणि फरक संभाव्य कोविड लशींवर कसा परिणाम करू शकतात.

अँटिजेनिक ड्रिफ्ट

विषाणूची प्रतिकृती होत असताना, त्याच्या जनुकांमध्ये ‘कॉपी करण्याच्या चुका’ (म्हणजे आनुवंशिक म्युटेशन ) होतात. कालांतराने, व्हायरसमधील इतर बदलांबरोबरच या आनुवंशिक कॉपीच्या त्रुटींमुळे विषाणूच्या पृष्ठभागावरील प्रथिने किंवा अँटिजेनमध्ये बदल होऊ शकतात. आपली रोगप्रतिकारक यंत्रणा व्हायरस ओळखण्यासाठी आणि लढण्यासाठी या अँटिजेनचा वापर करते. तर, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीपासून बचाव करण्यासाठी व्हायरसने बदल केल्यास काय होईल? इन्फ्लूएंझा विषाणूंमध्ये, आनुवंशिक म्युटेशन होतात आणि त्याचे अँटीजेन बदलत जातात-म्हणजे म्युटेशन झालेल्या विषाणूचा चेहरा मूळ विषाणूपेक्षा वेगळा दिसतो. इन्फ्लूएंझा विषाणू पुरेसा बदलल्यावर व्हायरसच्या जुन्या स्ट्रेन आणि पूर्वीच्या इन्फ्लूएंझा विषाणूंच्या संसर्गापासूनची प्रतिकारशक्ती यापुढे नवीन, बदलून गेलेल्या स्ट्रेनविरूद्ध लस काम करत नाहीत. त्यानंतर एखादी व्यक्ती नवीन, म्युटेशन झालेल्या फ्लू विषाणूंविरुद्ध असुरक्षित बनते. इन्फ्लूएंझा विषाणू बदलत असताना त्या बदलांबाबत दक्ष राहण्यासाठी, फ्लूच्या लसीचे दरवर्षी अपडेट करणे आवश्यक आहे, याचे मुख्य कारण म्हणजे अँटिजेनिक ड्रिफ्ट.

ओमिक्रॉन व्हेरिएंट सावध पावले गरजेची
राजकारणाचे ‘प्रादेशिक’ गणित

कोविडमध्येही असे होऊ शकते का?

कोविडच्या आनुवांशिक उत्क्रांतीबाबत आतापर्यंत जे निरीक्षण केले गेले, त्यावरून असे दिसून येते की इतर ‘आरएनए’ विषाणूंच्या तुलनेत हा विषाणू तुलनेने हळू हळू बदलत आहे. आजपर्यंतच्या अभ्यासाचा अंदाज आहे, की नवीन कोरोना विषाणू इन्फ्लूएंझा विषाणूपेक्षा सुमारे चारपटीने हळू बदलतो. कोविडचे म्युटेशन होत असले तरी, आतापर्यंत अँटिजेनिक ड्रीफ्ट होत असल्याचे दिसत नाही. तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की कोविड हा मानवांना संक्रमित करणारा नवीन शोधलेला विषाणू आहे. अजूनही बरेच अज्ञात आहेत आणि कोविड विषाणूबद्दलची समज वाढत आहे.

अँटिजेनिक शिफ्ट

इन्फ्लूएंझा विषाणू अँटिजेनिक शिफ्टमधून जातात, विषाणूच्या प्रतिजनांमध्ये अचानक, मोठा बदल जो अँटिजेनिक ड्रीफ्टपेक्षा कमी वारंवार होतो. जेव्हा दोन भिन्न, परंतु संबंधित, इन्फ्लूएंझा विषाणू एकाच वेळी यजमान पेशीला संक्रमित करतात, तेव्हा असे होते. कारण इन्फ्लूएंझा विषाणू जिनोम ‘आरएनए’च्या ८ स्वतंत्र तुकड्यांद्वारे तयार होतात (ज्याला ‘जिनोम सेगमेंट्स’ म्हणतात). रिसोर्टमेंट दरम्यान, दोन इन्फ्लूएंझा विषाणूचे जिनोम विभाग एकत्र करून इन्फ्लूएंझा विषाणूचा नवीन प्रकार तयार करू शकतात. कोरोना विषाणूमध्ये खंडित जिनोम नसतात आणि ते पुन्हा एकत्र करू शकत नाहीत. त्याऐवजी, कोरोना विषाणू जिनोम ‘आरएनए’च्या एकाच, खूप लांब तुकड्याने बनलेला आहे. तथापि, जेव्हा दोन कोरोना विषाणू एकाच पेशीला संक्रमित करतात, तेव्हा ते पुन्हा एकत्र होऊ शकतात. असे घडते, तेव्हा शास्त्रज्ञ विषाणूची ओळख ‘नॉव्हेल कोरोना विषाणू’ म्हणून करतात. नॉव्हेल कोरोना विषाणूची पिढी, जरी इन्फ्लूएंझा विषाणूमधील अँटी जेनिक शिफ्टपेक्षा वेगळ्या यंत्रणेद्वारे उद्भवली असली तरी, साथीच्या रोगाच्या प्रसारासह अनेक परिणाम होऊ शकतात.

ओमिक्रॉन म्युटेशनविषयी...

हा कोविडचा नवीन प्रकार भारतातील डेल्टा व्हेरिएंटच्या सध्याच्या स्थिर स्थितीला अस्वस्थ करू शकतो. २६ नोव्हेंबर रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारे याला ‘चिंतेचे म्युटेशन’ म्हणून जाहीर केले गेले आणि ओमिक्रॉन असे नाव देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हे प्रकार आढळून आले. तेव्हापासून हा व्हेरिअन्ट इस्राईल, बेल्जियम, हाँगकाँग, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि हॉलंड आणि इटलीमध्ये आढळला आहे. ओमिक्रॉन प्रकारात स्पाइक प्रोटिन क्षेत्रामध्ये ३० पेक्षा जास्त म्युटेशन आहेत, जे दोन गुणधर्म प्रदान करतात जे त्याला डेल्टापेक्षा वाईट बनवतात. एक, हे संक्रमित लोकांमध्ये खूप जास्त व्हायरल लोड आहे आणि परिणामी ते वेगाने पसरते, दुसरे ते लस घेतलेल्या व लशीमुळे प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनादेखील आजार देऊ करते.

ओमिक्रॉनच्या ५० म्युटेशनपैकी २६ नवीन आहेत. परंतु अधिक म्युटेशन्सचा अर्थ ते वाईट आहेत, असा होत नाही. म्युटेशन कधी कधी व्हायरसला अधिक भयावह बनवण्यासाठी एकत्र काम करतात, परंतु ते एकमेकांना रद्ददेखील करू शकतात. म्युटेशन एकमेकांच्या विरोधातदेखील कार्य करू शकतात, ज्याला ‘एपिस्टासिस’ म्हणतात, त्यामुळे वैज्ञानिकांना ओमिक्रॉनच्या गुणधर्मांबद्दल अनुमान काढणे अवघड जात आहे. या प्रकारातील म्युटेशन मोठ्या संक्रमकतेशी किंवा शरीराच्या रोगप्रतिकारक संरक्षणास चकवा देण्याच्या क्षमतेशी संबंधित असू शकतात.

ओमिक्रॉन व्हेरिएंट सावध पावले गरजेची
स्यू की यांना चार वर्षांचा तुरुंगवास

अशादेखील बातम्या येत आहेत की, नवीन ओमिक्रॉन प्रकार ‘अति सौम्य’ आहे आणि त्यामुळे आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत कोविड मृत्युदरात कुठेही वाढ झालेली नाही. ओमिक्रॉनचे निदान झाल्यामुळे रुग्णालयात दाखल किंवा मृत्यू झाल्याची कोणतीही बातमी नाही. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालये आणि डॉक्टरांच्या मते, बहुतेक रुग्णांना फक्त तीव्र डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे याचा अनुभव येतो.

ही बातमी दिलासादायक असली, तरी सर्व गोष्टींचे नीट परीक्षण होईपर्यंत लसीकरणाचा वेग वाढविणे, मास्क घालणे आणि सॅनिटायझरचा योग्य वापर करणे उत्तम राहील. आजारी रुग्णांनी कोविड ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करून घेणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत उपयुक्त असेल.

कोरोना आणि महत्त्वाचे म्युटेशन

  • अल्फा : बी. १.१.७ आणि क्यू लिनिएज

  • बीटा : बी. १.३५१ आणि डिसेंडंट लिनिइज

  • गॅमा : पी.१ आणि डिसेंडंट लिनिइज

  • एपसिलॉन : बी.१.४२७ आणि बी.१.४२९

  • इटा : बी.१.५२५

  • लोटा : बी. १.५२६

  • कॅप्पा : बी. १.६१७.१

  • म्यू-बी.१.६२१, बी.१.६२१.१

  • झिटा : पी.२

  • डेल्टा : बी.१.६१७.२ आणि ए वाय लिनिइज

  • मी क्रोन बी.१.१.५२९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com