मानवी स्वातंत्र्याचा उद्‌गाता

राजाराम ल. कानतोडे
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

ध्यानाच्या अनेक नव्या पद्धती त्यांनी विकसित केल्या. ते विज्ञान आणि अध्यात्मातील सेतू आणि मानवी स्वातंत्र्याचे उद्‌गाते होते. 14 डिसेंबर 1931 ला जन्मलेल्या ओशोंचे निर्वाण 19 जानेवारी 1990 ला झाले. 
त्यानिमित्त त्यांच्या विचारांवर केलेल्या या काही रचना...

अध्यात्म, विज्ञान आणि काव्य यांची सांगड घालून मानवी जीवन सुखी केले पाहिजे, हा मार्ग ओशो यांनी सांगितला. रजनीश चंद्रमोहन जैन असे मूळ नाव असणाऱ्या ओशोंच्या विचारांचे गारुड आजही जगावर आहे. त्यांची प्रवचने ऐकणे हा थक्क करुन सोडणारा अनुभव असतो. ध्यानाच्या अनेक नव्या पद्धती त्यांनी विकसित केल्या. ते विज्ञान आणि अध्यात्मातील सेतू आणि मानवी स्वातंत्र्याचे उद्‌गाते होते. 14 डिसेंबर 1931 ला जन्मलेल्या ओशोंचे निर्वाण 19 जानेवारी 1990 ला झाले. त्यानिमित्त त्यांच्या विचारांवर केलेल्या या काही रचना...

जन्म-मृत्यू
आपण जगतो उद्या अथवा कालमध्ये भूतकाळाची जीवाला खूप असते गोडी मनोकामना बांधत राहते सतत भविष्यासाठी माडीवर माडी सुटून जातो हातातून त्यापायी वर्तमान मग पैलतीर दिसायला लागला की हे राहिले ते राहिले म्हणून सुरू होतात आपल्याच आपल्याशी तक्रारी खरे तर कधीच कुणी मरत नाही अथवा कधी कुणी जन्मतही नाही सगळा खेळ रुपांतराचा असतो विज्ञानही सांगते अक्षय उर्जेचा नियम जगातही कधी काही निर्माण होत नाही किंवा नष्टही आपली सगळी कर्म जन्मतात कामनेतून त्यामुळे आपण त्याचा हिशोब ठेवतो. लाभ-हानी, सुख-दुःख, जय-पराजय अथवा पाप-पुण्यात फळाच्या अपेक्षेने देवपूजेसह सगळी कर्म आपण करत असतो जितकी अपेक्षा जास्त तितके फळ कमी चाचपा स्वतःत हा सिद्धांत  खरी की खोटा, तुमचे तुम्ही पाहा अपेक्षारहित कर्म सुरू झाले की आयुष्यात क्रांती घडते, कारण वर्तमान कर्म हा अधिकार फळ हा त्या परमेश्‍वराचा प्रसाद.

सुख दुःख
प्रत्येक आयुष्य भरलेले आहे सुख, दुःखाने आदर, सत्कार झाला की खुशी दुर्लक्षित ठेवले की घुस्सा अत्यंत क्षुद्र गोष्टींनी हलतो आपण गदागदा आपले असते या दोन्हींशी तादात्म्य त्यामुळे आपण राहतो नेहमी पराधीन, परतंत्र होऊ शकत नाही कधी स्वाधीन, स्वतंत्र धर्म सुखापासून सुटण्यापासूनचा मार्ग जो सुखापासून सुटतो, त्याचा दुःखाशी संबंधच रहात नाही प्रत्येक सुखाच्या मागे लपलेले दुःख, पीडा पाहा. प्रत्येक सुख हे प्रलोभन आहे. सुखापासून दुःखाशिवाय काही जन्मत नाही. सुख बीज तर दुःख फळ आहे. एका सुखाच्या आकांक्षेत अनेक दुःखाची बीज असतात. दुःखी लोक बाहेर पडतात धर्माच्या शोधात तथाकथित सुखी पेरतात स्वतःसाठी दुःखाची बीजे म्हणून सुख-दुःख, प्रिय-अप्रिय यात जो स्थिर राहतो तिथे परमेश्‍वर.

चाक आणि आस
सतत चालणे, बदलत राहणे हा संसाराचा स्वभाव स्थिर दगडही आस्थिर असतो. विज्ञान दाखविते त्याच्यात फिरणारे इलेक्‍ट्रॉन्स पृथ्वी स्वतःभोवती तशी सूर्याभोवतीही फिरते. या गतीत विश्राम नाही. आपण बसलो, झोपलो तरी ह्रद्य चालू असते. श्रम हा जगाचा स्वभाव आहे आणि अशांती हे फळ ज्याला विश्रामाला जायचे त्याने चेतनेचा शोध घ्यावा. चाक चालले तरी आस स्थिर राहतो. संसारातही काही अव्यक्त आस असतातच. वासना, तृष्णा, क्रोध, लोभ यांचे चाक आपल्या आसावर चालते. चाक सोडून दिले की सरकता येते आसाकडे विचार प्रचंड तीव्रतेत फिरतात. ते सोडून देणे जमत नाही आपल्याला आपले तादात्म्य असते त्यांच्याशी परमाधामाकडे जायचे असेल तर सोडावे लागतो. विचार आणि मनही आपण आपल्याला सोडून दिले की अज्ञान दूर जाते आणि सदा आपल्याजवळ असणारे ज्ञान शिल्लक उरते.

Web Title: osho on human liberation, spirituality