Pakistan cricket controversy : अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी...

Pakistan cricket board ICC World Cup controversy : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी बांगलादेशला पाठिंबा देण्याची धमकी देत भारताविरुद्ध माघार घेण्याचा विचार करत होते. पण आयसीसी आणि अन्य क्रिकेट मंडळांनी ठोस निर्णय घेत पाकिस्तानाला जागा मिळाली नाही, तसेच बांगलादेश स्पर्धेतून बाहेर राहिला.
Pakistan cricket controversy

Pakistan cricket controversy

sakal

Updated on

शैलेश नागवेकर

बांगलादेशला पाठिंबा म्हणून आम्हीसुद्धा टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार टाकू... आमच्या पंतप्रधानांशी चर्चा करून निर्णय घेऊ... नाहीतर भारताविरुद्धच्या साखळी सामन्यातून माघार घेऊ... अशा धमक्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी वेळोवेळी दिल्या; पण केवळ धमक्या देताना कृती करण्याची हिंमत मात्र त्यांच्यामध्ये नाही.

आजपासून बरोबर सातव्या दिवशी टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा बार थाटात उडालेला असेल आणि नाक मुरडणारा पाकिस्तानचा संघही सहभागी झालेला असेल. क्रिकेटच्या या भव्य सोहळ्यात आपल्यालाही सहभागी व्हायचे आहे; पण थोडे नाटक करून आपले अस्तित्व दाखवायचेय. क्रिकेट किंवा अन्य खेळाच्याच नव्हे, तर अशा प्रकारच्या भव्यदिव्य सोहळ्यात मिरवायला जायचे असते. फुकाची नौटंकी करून लक्ष वेधून घेण्याचा हा प्रकार कोणाला कळणार नाही, असा भ्रम काही विघ्नसंतोषींचा असतो. शेवटी नाक दाबून वाटेवरून चालावेच लागते. यासाठी एक चांगली म्हण आहे... अगं अगं म्हशी.. मला कुठं नेशी...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com