मॉन्सुन ट्रेकर्सला चॅलेंज देणारे पन्हाळा-पावनखिंड

संदीप खांडेकर
Sunday, 28 July 2019

कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात उतरणाऱ्या घाटांमध्ये पावसात कोसळणारे धबधबे, चिंब रस्ते, हिरवीगार गर्द झाडी मोहवते. शनिवार, रविवार हे ट्रेकिंगवाल्यांसाठी अगदी हक्काचे दिवस... 

कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणात उतरणाऱ्या घाटांमध्ये पावसात कोसळणारे धबधबे, चिंब रस्ते, हिरवीगार गर्द झाडी मोहवते. शनिवार, रविवार हे ट्रेकिंगवाल्यांसाठी अगदी हक्काचे दिवस... 

ट्रेकिंग कोल्हापूरकरांच्या आवडीचा विषय. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण ट्रेकिंगसाठी रानवाटा तुडवत असतात. मुसळधार पाऊस, कडाक्‍याच्या थंडीत ट्रेकिंगसाठी ग्रुप बाहेर पडतात. राधानगरी तालुक्‍यातील राऊतवाडी, खिंडी व्हरवडे आणि मानोली धबधब्याला पावसाळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी होते.

फेसाळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद पर्यटक घेतात. आंबोली घाटातील धबधब्यांकडेही पावले वळत आहेत. आजरा येथील रामतीर्थ आणि करंजफेणमधील बर्कीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जुन जातात. या जोडीलाच पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेसाठीही वर्षभर वाट पाहिली जाते. पन्हाळा ते पावनखिंड परिसरापर्यंतचे अंतर सुमारे ५४ किलोमीटर.

मुसळधार पाऊस, चिखलातल्या वाटा आणि बोचरा वारा असा थरार अनुभवण्यासाठी विविध संघटना या मोहिमांचे आयोजन करतात. हजारो मोहीमवीर यात सहभागी होऊन उत्तम ट्रेक पार केल्याचे समाधान मिळवतात. पावसाळा संपल्यानंतर जिल्ह्यातील गडकोट, अभयारण्यातून विविध ट्रेक केले जातात.

पन्हाळा ते पावनखिंड मोहीम (ट्रेक) 
    अंतर ५४ किलोमीटर
    पन्हाळगड ते मसाई पठार ट्रेक (जि. कोल्हापूर)
    मसाई पठारावर बौद्धकालीन गुहा व लेणी आहेत. पठार आणि त्यावरील फुले पाहण्यासाठी ट्रेकर येतात. 

रामतीर्थ धबधबा (ता. आजरा)
    हिरण्यकेशी नदीवर रामतीर्थ धबधबा
    कोल्हापूरपासून ८५ किलोमीटर 

आंबा (ता. शाहूवाडी)
    कोल्हापूरपासून ७० किलोमीटर 
रामलिंग, धुळोबा (ता. हातकणंगले)
    कोल्हापूर-हातकणंगले मार्गावर १५ किलोमीटरवर डावीकडून आत जाणारा रस्ता

मानोली धबधबा (ता. शाहूवाडी)
    कोल्हापूरपासून ७० किलोमीटर 
    कोल्हापूर-मलकापूर-आंबा-मानोली.

दाजीपूर अभयारण्य
    कोल्हापूरपासून ८० किलोमीटर 

खिद्रापूरचे कोपेश्वर (ता. शिरोळ)
    प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे मंदिर
    कोल्हापूरपासून ७० किलोमीटर 

विशाळगड (ता. शाहूवाडी)
    कोल्हापूरपासून ९० किलोमीटर

पारगड (ता. चंदगड)
    चंदगड ते तिलारी मार्गावर

बर्की धबधबा (ता. शाहूवाडी)
    कोल्हापूरपासून ४० किलोमीटर
    कळे, बाजार भोगाव, करंजफेणमार्गे चाळीस किलोमीटर 
    कोल्हापूर, मलकापूर, पांढरेपाणी, येळवण जुगाई, 
    मांजरेमार्गे ७० किलोमीटर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panhala to Pavankhind Trekking Campaign Waterfall Tourism