Prabha PuneSakal
सप्तरंग
परंपरा आणि चवीचा समतोल
प्रभा विश्रांती गृहचा बटाटा वडा म्हणजे पुण्याच्या खाद्यपरंपरेची जिवंत आठवण – १९४० पासून आजपर्यंत बदल न झालेली एकमेव चव!
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
‘बटाटा वडा’ ही पुण्यातील ‘प्रभा’ची ओळख. तोच खाण्यासाठी इथे सकाळ-संध्याकाळी खवय्यांची रांग लागलेली दिसते. मुंबईतील वडापावमधील वड्यासारखा हा वडा नव्हे. इथे नुसताच बटाटा-वडा मिळतो. इथे वडे विकले जातात, चटणी नाही!

