वाहनाचा योग्य विमा उतरवण्यापूर्वी...

मोटार इन्शुरन्स अर्थात वाहनाचा विमा काढणे भारतात सर्वत्र अनिवार्य आहे. सामान्यत: वाहनांसाठी विमा कवच दोन प्रकारचे असतात. यात प्रथम अनिवार्य असलेला विमा म्हणजे थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स.
Praneet Pawar writes Motor insurance
Praneet Pawar writes Motor insurancesakal
Summary

मोटार इन्शुरन्स अर्थात वाहनाचा विमा काढणे भारतात सर्वत्र अनिवार्य आहे. सामान्यत: वाहनांसाठी विमा कवच दोन प्रकारचे असतात. यात प्रथम अनिवार्य असलेला विमा म्हणजे थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स.

मोटार इन्शुरन्स अर्थात वाहनाचा विमा काढणे भारतात सर्वत्र अनिवार्य आहे. सामान्यत: वाहनांसाठी विमा कवच दोन प्रकारचे असतात. यात प्रथम अनिवार्य असलेला विमा म्हणजे थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स. ज्यामध्ये केवळ दुसरी व्यक्ती, वाहन किंवा मालमत्तेचे नुकसान आणि हानीसाठी सुरक्षा कवच मिळते. दुसरे, ऑन डॅमेज कव्हर जे विमाधारकाला अपघात, आग, नैसर्गिक आपत्ती, चोरी आदींमुळे वाहनाच्या होणाऱ्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण करते. यात कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर म्हणजेच ‘सर्वसमावेशक विमा कवच’देखील निवडू शकतो, ज्यामध्ये थर्ड पार्टीची जबाबदारी आणि एखाद्याच्या वाहनाचे होणारे नुकसान या दोन्हींचा समावेश असतो.

सर्वप्रथम थर्ड पार्टी विमा म्हणजे, जो स्वत:साठी नव्हे तर इतरांसाठी खरेदी केली जातो. एखाद्या वाहनाचा ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ हे या प्रकारातील सर्वांत परिचित उदाहरण आहे. यामध्ये कारचालकाकडून रस्ते अपघाताच्या प्रसंगी तृतीय पक्षाचे केल्या जाणाऱ्या नुकसान व हानीची भरपाई दिली जाते.

आपण आपल्या वाहनासाठी निवडलेल्या प्लॅनच्या आधारे विमा कव्हरचे फायदे भिन्न असतात. अशावेळी वाहनाला आणि समोरील व्यक्तीला संपूर्ण संरक्षण देण्यासाठी पुरेसा प्लॅन खरेदी करणे सोईस्कर ठरत असल्याचे डिजिट इन्शुरन्सचे प्रमुख विवेक चतुर्वेदी यांनी सांगितले. वाहनासाठी विमा निवडताना इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू, ॲड-ऑन्सचे पुनरावलोकन, रोडसाइड असिस्टन्स ॲड-ऑन इंजिन संरक्षण, झिरो डिप्रिसिएशन प्लॅन, रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर या बाबींची पडताळणी कराव्यात.

इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू (आयडीव्ही) : एखाद्या पॉलिसीमध्ये नमूद केलेले इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू तपासणे आवश्यक आहे. कारण नुकसान झाल्यास इन्शुरन्स कंपनी देय असलेली रक्कम आयडीव्हीवर ठरते. आयडीव्ही हे एखाद्या वाहनाचे बाजार मूल्य आहे आणि विमा नियामकाने निश्चित केलेल्या डिप्रिसिएशन (घसारा) दराच्या आधारे मोजले जाते. प्रत्येक वर्षागणिक वाहनाचे मूल्य कमी होत जाते. त्यामुळे, हा आयडीव्ही कमी होत राहतो. एखाद्या विमा कंपनीने कमी प्रीमियम ऑफर केल्यास त्या विम्याचा आयडीव्ही कमी असतो.

ऑफर्सची पडताळणी : विमा पर्यायात असलेले अतिरिक्त विमा कवच आणि अंतर्भूत घटकांची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरते. यात काही कंपन्या स्टँडर्ड ऑफर व्यतिरिक्त, अतिरिक्त दराने अनेक ऑफर्स देतात. काही ॲड-ऑन वाहनांना अतिरिक्त संरक्षण प्रदान करते जे सामान्यत: स्टँडर्ड ऑन डॅमेज किंवा थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्शुरन्सद्वारे कव्हर केले जाऊ शकत नाही.

रोडसाइड असिस्टन्स : रोडसाइड असिस्टन्स ही हल्लीच्या काळात सर्वांत प्रचलित आणि उपयुक्त बाब आहे. आपले वाहन शहरापासून विशिष्ट अंतरावर खराब झाल्यास या प्रकारची मदत उपयोगी पडते. टायर पंक्चर झाल्यास चाके फिक्स करणे किंवा इंजिन खराब झाल्यास वाहन टोइंग करून नेणे, यासारखे फायदेही यात दिले जातात.

इंजिन संरक्षण : इंजिन हा कारचा सर्वांत महत्त्वाचा भाग. स्टँडर्ड पॉलिसीमध्ये सहसा नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान किंवा त्यानंतरचे परिणाम यांचा समावेश नसतो. त्यामुळे एखाद्या पॉलिसीत ‘इंजिन संरक्षण’ कवच आपल्या वाहनास नैसर्गिक आपत्तींमुळे, वंगण तेल किंवा पाणी गळती होऊन वाहनात ते शिरल्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देते.

रिटर्न टू इनव्हॉइस कव्हर : कार विम्यामधील हे सर्वांत मौल्यवान कव्हर आहे. यात विमाधारकाला पूर्ण नुकसान भरपाई, म्हणजे चोरी किंवा दुरुस्तीच्या पलीकडे नुकसान झाल्यास वाहनाचे शेवटचे संपूर्ण मूल्य प्राप्त करण्यास मदत करते. हे वाहनाच्या आयडीव्हीपुरते मर्यादित नसते. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाच वर्षांपेक्षा कमी जुन्या वाहनांना हे विमा कवच मिळते. तर, झिरो डिप्रिसिएशन प्लॅनमध्ये वाहनातील रबर, प्लास्टिक आणि फायबर घटकांची दुरुस्ती आणि बदली खर्च समाविष्ट केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com