Gujjar Boli
sakal
सप्तरंग
खान्देशातील अमूल्य वारसा
खान्देशातील गुर्जर समाजाची बोली जपण्यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. गुर्जर बोली साहित्य, लोकगाणी आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे ही भाषा जिवंत राहत आहे.
डॉ. जे. बी. अंजने-saptrang@esakal.com
प्रामुख्याने गुजरातमधून स्थलांतरित झालेल्या गुर्जर समाजाचा शैक्षणिक विकास होतानाच गुर्जर बोली बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. परंतु ही बोली कायमची लोप पावू नये म्हणून जळगावमध्ये काही मंडळी कार्यरत आहेत. या समाजातले व समाजाबाहेरचेही लोक गुर्जर बोलीत साहित्यनिर्मिती करू लागले आहेत. हे एक सुचिन्हच!

