अशी बोलते माझी कविता (प्रा. वसंत खोत)

प्रा. वसंत खोत, कोल्हापूर ९५९५८०६०२०
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

...ऐकणारं कुणीच नाही!

अखंड आवाजांचा दर्या उसळलाय
-माझ्या सभोवती
कानठळ्या बसवणारे चित्र-विचित्र भेसूर आवाज
आदळताहेत चहूदिशांनी
वाटतं,
कानाला बसताहेत दडे
मेंदूच्या होताहेत ठिकऱ्या ठिकऱ्या
एकमेकांत मिसळून उसळणाऱ्या आवाजांची ही कारंजी...

सगळेच बोलताहेत वरच्या पट्टीत...एकाच वेळी
ऐकणारं कुणीच नाही!

ओळखू येत नाही कुणाचाच आवाज
उमगत नाही भाषा, शब्द अन्‌ त्यांचे अर्थ
काहीच कळेनासं झालंय...

...ऐकणारं कुणीच नाही!

अखंड आवाजांचा दर्या उसळलाय
-माझ्या सभोवती
कानठळ्या बसवणारे चित्र-विचित्र भेसूर आवाज
आदळताहेत चहूदिशांनी
वाटतं,
कानाला बसताहेत दडे
मेंदूच्या होताहेत ठिकऱ्या ठिकऱ्या
एकमेकांत मिसळून उसळणाऱ्या आवाजांची ही कारंजी...

सगळेच बोलताहेत वरच्या पट्टीत...एकाच वेळी
ऐकणारं कुणीच नाही!

ओळखू येत नाही कुणाचाच आवाज
उमगत नाही भाषा, शब्द अन्‌ त्यांचे अर्थ
काहीच कळेनासं झालंय...

या अखंड गदारोळात मी हरवून बसलोय
माझा आतला-ओळखीचा आवाज
दाटून आलेलं बोलण्यासाठी, काही सांगण्यासाठी
मी करतोय नुसतेच हातवारे नि खाणाखुणा

अफाट गर्दीत मी असा
शब्दविहीन, हताश, एकाकी उभा
कुणी ऐकत-बघतही नाही माझ्या दिशेनं

मला आता त्याची गरजही वाटत नाही!

Web Title: prof vasant khot's poem in saptarang