historical pune
Esakal
सुरेंद्र पाटसकर
surendra.pataskar@esakal.com
एखादे शहर प्रगतिपथावर कसे पोहोचले असे पाहायचे असेल, तर त्याचा इतिहास तपासला पाहिजे. हा इतिहास शास्त्रोक्त पद्धतीने लिहिला असेल तरच वस्तुनिष्ठ ठरतो. पुण्याचा इतिहासही शास्त्रोक्त पद्धतीने लिहिला गेलेला नाही, ही उणीव काही प्रमाणात डॉ. अविनाश सोवनी यांनी ‘पुणे शहराचा इतिहास’ या आपल्या पुस्तकाद्वारे भरून काढली आहे.
पुणे शहराला दीड हजार वर्षांपेक्षाही मोठा इतिहास आहे. या शहराची माहिती सांगणारी काही पुस्तके आधी प्रकाशित झाली आहेत. मात्र, त्यात आख्यायिकांचा भरणा अधिक आहे. तसेच, गॅझेटिअरमध्येही पुरेशी वस्तुनिष्ठ माहिती नसल्याचे इतिहासअभ्यासकांनी दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्राचीन काळ ते पेशवाईची अखेर’ म्हणजेच १९व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतच्या कालखंडाचा इतिहास या पुस्तकात प्रामुख्याने मांडला आहे. मूळ मजकूर आणि त्यावरील टिपणी लक्षात यावी यासाठी वेगवेगळी रंगसंगती पुस्तकात वापरली आहे.