Sunday Special : आशेची पालवी...

india-forest
india-forest

रोजची झाडांची कत्तल, वाढणारे तापमान, निसर्गाच्या लहरीपणामुळे आता काही खरे नाही, अशी चिंता व्यक्त होत असतानाच भारताने आपले वनक्षेत्र आणि वृक्ष लागवड क्षेत्रात मागील दोन वर्षांत तब्बल पाच हजार १८८ चौरस किलोमीटरने वाढ करून आशेचा किरण दाखवलाय. केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकरांनी, २०१४ ते २०१८ या कालावधीत वृक्ष आणि वनक्षेत्रात १३ हजार २०९ चौरस किलोमीटरने वाढल्याचे जाहीर केले आहे. 

महाराष्ट्रात फळबागांचे क्षेत्र वाढलेय. आंबा, बोर आणि डाळिंबाच्या तीन कोटी वृक्षांची लागवड होते आणि ९०-९५ टक्के वृक्ष जगतात. गेल्या १८ वर्षांत महाराष्ट्रात १८ कोटी वृक्ष वाढलेत. राज्याच्या वनाच्छादनात ९५.५६ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. ती गेल्या वेळच्या तुलनेत ०.१९ टक्का आहे. वनेतर क्षेत्रात वृक्ष आवरणात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावलाय. भारतीय वनसर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे एकूण वनाच्छादन क्षेत्र ५० हजार ७७८ चौरस किलोमीटर आहे. २०१७ मध्ये ते ५०,६८२ चौरस किलोमीटर होते. कांदळवन क्षेत्र ३२० चौरस किलोमीटर झालेले आहे. महाराष्ट्रात रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत प्रामुख्याने 

वाढ झाली आहे. कांदळवन क्षेत्राची पुनर्निर्मिती व संगोपनासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली. मनुष्यबळ व संसाधने दिलीत. त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्यांच्या उपजीविकेसाठी विशेष योजना कार्यान्वित करण्यात आली. परिणामी, कांदळवन क्षेत्राचे चांगले संवर्धन झाले. क्षेत्रात वाढ झाली.

राज्याच्या अतिघनदाट वनाच्छादनामध्ये १५ चौरस किलोमीटरने, मध्यम घनदाट वनाच्छादनामध्ये ६० चौरस किलोमीटरने घट झाली आहे. खुल्या वनाच्छादनामध्ये ११९ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. वनाच्छादन क्षेत्रातील वरील वाढ आणि घट कोणत्या ठिकाणी व कोणत्या कारणास्तव झाली आहे, याकरिता भारतीय वनसर्वेक्षण विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्‍चित  करता येणार आहे.

भारतीय वनस्थिती अहवाल २०१९ नुसार महाराष्ट्रात ४४०.५१ दशलक्ष टन कार्बनसाठा आहे. देशात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. या अहवालानुसार, घनदाट बांबू क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रगण्य आहे. एकूण बांबूप्रवण क्षेत्रात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. वनेतर क्षेत्रामध्ये २०१७च्या अहवालानुसार वृक्षआवरण ९,८३१ चौरस किलोमीटर होते. २०१९च्या अहवालानुसार वृक्षआवरण १०,८०६ चौरस किलोमीटर आहे. वनेतर क्षेत्रामध्ये ९७१ चौरस किलोमीटर वाढ झाली आहे. वनेतर क्षेत्रात वृक्षआवरणात महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावलाय.

वनेतर क्षेत्रातील वृक्षआवरणात महाराष्ट्राने अव्वल राहण्याची परंपरा कायम राखली आहे. हवामानबदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी वनेतर क्षेत्रावर वृक्षआवरण वाढवणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
- एम. के. राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com