‘तथाकथित गांधीवाद्यां’च्या मनात संघाचा दृष्टिकोन...

फिरोज मिठीबोरवाला यांचा एक गांधीवादी कार्यकर्ता म्हणून परिचयात्मक लेख प्रसिद्ध झाला आहे. मिठीबोरवाला यांनी गांधीविचारांवर कित्येक आंदोलनं व कामं केली असल्याबद्दल लिहिलं आहे.
Mahatma Gandhi
Mahatma GandhiSakal
Summary

फिरोज मिठीबोरवाला यांचा एक गांधीवादी कार्यकर्ता म्हणून परिचयात्मक लेख प्रसिद्ध झाला आहे. मिठीबोरवाला यांनी गांधीविचारांवर कित्येक आंदोलनं व कामं केली असल्याबद्दल लिहिलं आहे.

फिरोज मिठीबोरवाला यांचा एक गांधीवादी कार्यकर्ता म्हणून परिचयात्मक लेख प्रसिद्ध झाला (सकाळ सप्तरंग - ०२ ऑक्टोबर) आहे. मिठीबोरवाला यांनी गांधीविचारांवर कित्येक आंदोलनं व कामं केली असल्याबद्दल लिहिलं आहे.

मुंबईत पन्नास हजार शेतकरी त्यांनी आणले होते, अशी बरीच नवी माहिती कळाली. मुस्लिमांच्या विविध प्रश्नांवर अतिशय स्पष्ट व धाडसी भूमिका घेतली गेली, तसंच ट्रिपल तलाकबाबतच्या सध्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्यात आला आणि इतर मुस्लिम संघटना त्याला विरोध करत असताना त्यांनी त्याला पाठिंबा दिल्याने इतर संघटनांनी त्यांच्याशी संपर्क तोडला तरीही ते ठाम राहिले, असा मजकूर त्यांच्याबद्दल लिहिला आहे. इतर संघटना काय म्हणत होत्या त्याची दखल घ्यावी, अशी लेखकाला गरज वाटली नाही.

मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांवर व तलाकविरोधी काम करणाऱ्या मी व अनेक महिला कार्यकर्त्यांनी व डाव्या संघटनांनी व व्यक्तींनी भाजपप्रणीत सरकारच्या या कायद्यात अनेक अंतर्गत विरोधाभास दाखवून दिले आणि या कायद्यास विरोध केला होता, कारण हा कायदा मुस्लिम स्त्रियांबद्दल केवळ नक्राश्रू ढाळत, कौटुंबिक कायद्याअंतर्गत त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी, या प्रश्नावर धर्मनिरपेक्ष कायदा करण्याऐवजी, या प्रश्नाचं गुन्हेगारीकरण करून मुस्लिम स्त्रीचं कौटुंबिक आयुष्य अजून खडतर बनवू पहात होता व तो आणण्याचा हेतू मुस्लिम स्त्रीला न्याय मिळण्याऐवजी समाजाला अजून प्रताडित करण्याचा होता. तेव्हा या कायद्यावरून सत्ताधारी भाजपला समर्थन देण्यात व त्यांचीच री ओढण्यात लेखकाला कुठली बहादुरी व गांधीविचार सांगायचा आहे, हे समजत नाही.

तसंच, मुस्लिम समाजातील ज्या अनेक घडामोडींवर त्यांच्याकडून ‘निर्भय’ भूमिका घेण्यात आल्याचा उल्लेख आहे, त्यांत सलमान रश्दींवर हल्ला, उदयपूर घटना, फ्रान्समधील घटना इत्यादींचा उल्लेख करून त्या ‘पारंपरिक मुस्लिमांना’ न आवडण्याचा दावा करण्यात लेखकाचा व मिठीबोरवाला यांचा विशिष्ट पूर्वग्रह दिसतो की, मुस्लिम हे ‘असेच’ असतात. शिवाय, या घडामोडींमध्ये देशातील मॉबलिचिंग व अत्याचाराच्या घटनांबद्दल त्यांच्याकडून ‘निर्भय’ भूमिकेचा उल्लेख नाही किंवा ते सोईचं नसावं. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे, काही तथाकथित गांधीवाद्यांच्या मनात मुसलमानांच्या बाबत संघाचा दृष्टिकोन कसा उसळी मारत राहतो हे जाणवलं.

- रझिया पटेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com