esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

horoscope

सोमवार, अधिक आश्विन शुद्ध 12, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.25, चंद्रोदय स. 4.31, चंद्रास्त रात्री 3.21, भारतीय सौर 6, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिनविशेष - 
1929 - भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिन. जगात सर्वाधिक गाणी गायिलेली पार्श्वगायिका म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद.
2003 - धनराज पिल्लेच्या नेतृत्वाखाली भारताच्या हॉकी संघाने पाकचा 4-2 असा पराभव करून आशियाई हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद पहिल्यांदाच पटकावलं.

पंचांग -

सोमवार, अधिक आश्विन शुद्ध 12, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.27, सूर्यास्त 6.25, चंद्रोदय स. 4.31, चंद्रास्त रात्री 3.21, भारतीय सौर 6, शके 1942.

राशिभविष्य
मेष -
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.
वृषभ - मानसिक सौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबासाठी वेळ घालवाल. 
मिथुन - सुसंधी लाभेल. धार्मिक कार्यात सहभाही व्हाल. मानसिक चंचलता जाणवेल.
कर्क - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
सिंह - वैवाहिक सौख्य लाभेल. भागिदारी व्यवसायात लाभ होतील. प्रवास सुखकर होतील. 
कन्या - चिडचिडेपणा जाणवेल. आत्मविश्वासाचा अभाव राहील. संकटे उद्भवण्याची शक्यता आहे. 
तूळ - बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.
वृश्चिक - व्यवसाय, उद्योगधंद्यात सुयश लाभेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. 
धनू - आजचा दिवस आनंदी आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. सौख्य लाभेल.
मकर - आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. गुप्त वार्ता समजतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 
कुंभ - आरोग्य चांगले राहील. आत्मविश्वास व मनोबल वाढेल.
मीन - मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.