Saina Nehwal Retirement : साईना नेहवालची निवृत्ती: भारतीय बॅडमिंटनला दिला नवा आयाम

Saina Nehwal retirement from badminton career : साईना नेहवालने जानेवारीतील मुलाखतीत निवृत्ती जाहीर केली. तिच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय बॅडमिंटनला जागतिक ओळख मिळाली. महिला खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि नवी पिढी घडवण्याची प्रेरणा तिने दिली.
Saina Nehwal Retirement

Saina Nehwal Retirement

sakal

Updated on: 

जयेंद्र लोंढे

भारताची पहिली खरीखुरी ‘फुलराणी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साईना नेहवालने जानेवारीत एका मुलाखतीदरम्यान निवृत्ती घोषित केली. मागील दोन वर्षे ती बॅडमिंटन कोर्टवर उतरली नव्हती. बॅडमिंटनपासून दूर जाणे हे अधिकृतपणे सांगण्याची काय गरज, असे ती या वेळी म्हणाली. स्वत:च्या अटीवर मी या खेळामध्ये आली अन्‌ स्वत:च्या अटीनुसार यामधून बाहेर गेली, असे सांगताना तिने कोर्टबाहेरही दमदार स्मॅश लगावला. तिच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील देदीप्यमान कामगिरीमुळे भारतामध्ये बॅडमिंटनला वेगळी उंची प्राप्त झाली. विशेषत: महिला खेळाडूंमध्ये कारकीर्द घडवण्याची उमेद निर्माण झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com