अशी बोलते माझी कविता (संभाजी धावरे)

संभाजी धावरे
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

सप्तपदी

सप्तपदी...
तू रोजच चालतेस
माझ्यासोबत
सप्तपदी

माझ्या सुखात
माझ्या दुःखात
माझ्या सर्वस्वात
माझ्या अंतरंगात
तूच असतेस माझ्या सोबत
पदोपदी

समजून घेतेस
प्रेम देतेस
रागावतेस...भांडतेससुद्धा
कधी कधी

पण जेव्हा
माझीच पावलं डगमगतात
वेडी-वाकडी पडतात
तेव्हा तूच मला सावरतेस
माझा आधार होतेस

मग असं वाटतं,
माझ्यासोबत तू नव्हे
तर तुझ्यासोबत मीच चालतोय
सप्तपदी!

- संभाजी धावरे, दिवा (ठाणे)
८४२५९१९१८५

सप्तपदी

सप्तपदी...
तू रोजच चालतेस
माझ्यासोबत
सप्तपदी

माझ्या सुखात
माझ्या दुःखात
माझ्या सर्वस्वात
माझ्या अंतरंगात
तूच असतेस माझ्या सोबत
पदोपदी

समजून घेतेस
प्रेम देतेस
रागावतेस...भांडतेससुद्धा
कधी कधी

पण जेव्हा
माझीच पावलं डगमगतात
वेडी-वाकडी पडतात
तेव्हा तूच मला सावरतेस
माझा आधार होतेस

मग असं वाटतं,
माझ्यासोबत तू नव्हे
तर तुझ्यासोबत मीच चालतोय
सप्तपदी!

- संभाजी धावरे, दिवा (ठाणे)
८४२५९१९१८५

Web Title: sambhaji dhawre's poem

टॅग्स
फोटो गॅलरी