महावितरण यंत्रणा नरमली; झुकलेला खांब झाला सरळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

दिघंचीत रणदिवे कुटुंबाला मिळाला दिलासा

दिघंची (सांगली): महावितरणच्या कारभारासंबंधी "सकाळ' च्या वृत्ताची दखल घेत अखेर येथील सर्जेराव रणदिवे यांच्या घरासमोरील झुकलेला खांब सरळ केला. 27 मार्च रोजी "महावितरणचा दिघंचीत भोंगळ कारभार' असे वृत्त प्रसिद्ध झाले.

शनिवारी (ता. 7) सायंकाळी वादळामुळे रणदिवे कुटुंब भयभीत झाले होते. त्यांनी घराबाहेर बसून रात्र काढली. केव्हा वादळी वाऱ्यामुळे झुकलेला खांब घरावर पडेल याचा नेम नव्हता. त्यांनी घराबाहेर राहणेच पसंद केले. वृत्त प्रसिद्ध झाल्यावर समस्या सोडवण्याऐवजी महावितरणचे कर्मचारी रणदिवे कुटुंबीयांना "पेपरवाल्याकडूनच खांब सरळ करून घ्या' अशी अरेरावी करीत होता. तर रणदिवे कुटुंब महावितरणकडे हेलपाटे मारत होते.

दरम्यान, महावितरण कार्यालयाला अधिकारीच नसल्याने येथील यंत्रणा कोलमडली आहे. ग्राहकांच्या अनेक समस्या आहेत. त्याची दखल कोण घेणार? ग्राहकांनी दाद कोणाकडे मागायची ? असा प्रश्न आहे, सरपंच अमोल मोरे यांनीही अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महावितरणकडे येथील यंत्रणेकडे लक्ष द्यावे. अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. ग्राहकांना त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: sangli mseb mahavitran