‘भरपूर पाणी प्या’ (हृषिकेश पांडे)

hrishikesh pandey
hrishikesh pandey

विशिष्ट आहार पाळताना लोक पाण्याचं सेवन ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट विसरतात. मी विशिष्ट आहाराचं पालन करतो; पण भरपूर पाणी पोटात जाईल याची खातरजमा करतो. विशेषत: हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी मला मदत करतं. मी फक्त कच्च्या भाज्या, फळं आणि नैसर्गिक प्रथिनं खातो. मी मांसाहारी जेवण करत नाही.

तंदुरुस्तीची माझी व्याख्या अगदी सोपी आहे. या संदर्भात विविध लोकांची मतं वेगवेगळी असतात. आरोग्यसंपन्न राहण्याचे बरेच मार्ग आहेत; पण माझ्या मते मानसिक शांतता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मानसिक शांतताच अनेक गोष्टींमुळे आवश्‍यक असते. भावी यशाची मानसिक शांतता ही पहिली पायरी असते. तुमचं मन शांत असेल, तेव्हाच तुम्हाला जीवनात काय मिळवायचं आहे, त्याचा विचार करता येतो. तसंच तुम्हाला जीवनात जे काही करायचं आहे, त्यासाठी आनंदी राहणं गरजेचं आहे. तुम्हाला मानसिक शांतता असेल आणि तुमच जीवन आनंदी असेल, तर शारीरिक तंदुरुस्ती राखणं ही सर्वांत सोपी गोष्ट असते.

भरपूर पाणी पितो
विशिष्ट आहार पाळताना लोक पाण्याचं सेवन ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट विसरतात. मी विशिष्ट आहाराचं पालन करतो; पण भरपूर पाणी पोटात जाईल याची खातरजमा करतो. विशेषत: हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी मला मदत करतं. मी फक्त कच्च्या भाज्या, फळं आणि नैसर्गिक प्रथिनं खातो. मी मांसाहारी जेवण करायचो, ज्यात मासे आणि कोंबडीचा समावेश असायचा; पण आता मी ते थांबवलं आहे. सध्या ‘स्टार भारत’ या वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जगत्‌जननी मॉं वैष्णोदेवी- कहानी मातारानी की’ या मालिकेमध्ये राजा रत्नाकर यांची भूमिका साकारल्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा मांसाहार घेणं मी बंद केलं आहे. मात्र, कच्च्या भाज्या आणि फळांसह शाकाहारी आहाराचं अनुसरण करत आहे.

मी खूप दिवसांपासून कसरत करतो. माझी कसरत फक्त व्यायामाच्या आणि वेटलिफ्टिंगच्या विशिष्ट संचापुरती मर्यादित नाही. मी इतरही व्यायाम करतो- जे केवळ व्यायामशाळेपुरते मर्यादित नाहीत. मी चढतो, पूल-अप करतो. माझ्यासाठी आता थोडा वेळ बाजूला काढणं आणि नियमितपणे व्यायामशाळेत जाणं जरा अवघड जात आहे; परंतु मी तिथंही व्यायामाला सुरवात करीन. मी खूप चालतो. चित्रीकरण झाल्यानंतरही मी माझ्या ड्रायव्हरला असं सांगतो, की मी चालत जाऊ शकेन अशा ठिकाणी मला घेऊन जा. विशेष म्हणजे कसरत करण्यासाठी काही विशिष्ट वेळ नाही; पण मी माझ्या वेगळ्या पद्धतीची कसरत करतो.

जिममध्ये व्यायाम करणं फार चांगलं असतं. काही जण तिथं वजन कमी करायला येतात, काही जण शरीर बांधेसूद ठेवायला येतात, काही जण वजन वाढवण्यासाठी येतात; तर काही जण ताकद मिळवण्यासाठी येतात; पण या गोष्टी केवळ जिममध्येच होतात, असं नाही. जिम्नॅस्ट आणि ऍथलिट लोकांसाठीही जिम असते. अर्थात जिममध्ये गेल्यावर तुम्हाला जे हवं ते मिळेलच, याची काही खात्री नसते. कारण व्यायामाबरोबरच तुम्हाला तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं, तुम्हाला व्यायामाची वेळ पाळावी लागतात आणि तुम्ही कसा व्यायाम करता, त्याकडेही लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मी असं म्हणेन, की जिमला जाणं आणि शिस्त पाळणं याला अधिक महत्त्व आहे. इथंच नव्हे, तर जीवनात वेगवेगळ्या ठिकाणी.

शिस्त पाळणं महत्त्वाचं
मी आधी म्हटलं तसं, शिस्त पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जो व्यायाम करता, त्यात बदल करण्यासाठी काही काटेकोर नियम नसतात. पण तुम्ही शांतपणे जे करता, ते सतत करत राहणं आणि विशिष्ट पॅटर्न पाळणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जीवनात शिस्तबद्ध असाल, तर बदल घडून येतातच. मी व्यायामाला सुरवात केली, त्यावेळी मी मार्गदर्शन घेत असे. मी प्रशिक्षकांकडून बरंच काही शिकलो आहे; पण हळूहळू सरावानं मला अनेक गोष्टी स्वत:च करता येऊ लागल्या आहेत. मी विशिष्ट प्रकारचा व्यायाम करतो. त्यात मला कुठं दुखापत होणार नाही, याची काळजी घेतो.
पौराणिक मालिकांसाठी चित्रीकरण करणं ही मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला तुमचे संवाद अचूकतेनं आणि दमदारपणे म्हणावे लागतात. अनेकदा मी संगीत ऐकतो. संगीतामुळेच माझं मन ताजंतवानं होतं. संगीत माझं मन शांत करतं आणि मला पुढं काय करायचं आहे, ते जाणून घेण्यात मदत करतं.

योगासनं, प्राणायामाचाही अवलंब
मी जिममध्ये जाण्याच्या कितीतरी आधीपासूनच योगासनं आणि प्राणायाम करत आहे. मला सर्व योगासनं येतात. एक अभिनेता म्हणून विशिष्ट पद्धतीनं उभं राहणं, बसणं वगैरेंसाठी मला त्यांचा उपयोग होतो. आता मी एका राजाची भूमिका रंगवत असताना मला त्यांचा खूपच चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे.

वजन कमी-जास्त करणं
‘जगत्‌जननी मॉं वैष्णोदेवी- कहानी मातारानी की’ या मालिकेमध्ये राजा रत्नाकर या व्यक्तिरेखेसाठी मी माझं वजन आठ किलोंनी कमी केलं आहे. यात मी एका पित्याची भूमिका साकारत असल्यानं मला त्या भूमिकेला साजेसं वजन राखणं आवश्‍यक होतं. पूर्वी मला एका भूमिकेसाठी जाडं दिसणं आवश्‍यक होतं, तेव्हा मी माझं वजन आठ किलोंनी वाढवलंही होतं. वजन वाढवणं आणि कमी करणं हा माझ्या व्यवसायाचा भागच बनला आहे. आणि आता राजा रत्नाकर या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्यासाठी मी आवश्‍यक तेवढं वजन कमी करण्यावर भर दिला आहे. राजा रत्नाकर हा एक शूर, प्रामाणिक आणि आशावादी राजा असतो; पण त्याला मूल होत नसतं. या राजाची व्यक्तिरेखा ही अन्य राजांच्या तुलनेत अगदीच वेगळी आहे.

मित्रही जागरूक
मी नेहमी तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतो, यामुळे माझे कुटुंबीय माझ्यावर खूष आहेत. विशेष म्हणजे माझे मित्र माझा वेलनेस पाहून तेही आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. माझेकुटुंबीयही खाण्या-पिण्याच्या वेळा माझ्याप्रमाणं काटेकोरपणे पाळतात.

तुम्ही तंदुरुस्त असता, तेव्हा तुम्हाला आपोआपच जाणवतं, की तुम्ही आरोग्यसंपन्न आहात आणि तुमचं मनही शांत आहे. माझी प्रेरणा सरळसाधी आहे. शिस्तीचं पालन करा आणि नियमितपणे जे करता ते करत राहा. मग तुम्हाला जे हवं ते मिळेल.
माझे वडील हेच माझं प्रेरणास्थान आहे. मला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात, त्या करण्यासाठी माझ्या वडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं होतं. माझ्या कुटुंबाला लष्करी सेवेची पार्श्‍वभूमी असल्यानं जीवनात विशिष्ट मूल्यं आणि चांगल्या गोष्टी कोणत्या ते मला पूर्वीपासूनच माहीत होतं. ज्यामुळे तुमचं जीवन संपन्न आणि सुखकारक होतं, त्या गोष्टींचं काळजीपूर्वक निरीक्षण करणं गरजेचं असतं.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com