एज्यु कॉर्नर : मुलांच्या आहारावर मानसिक, बौद्धिक विकास अवलंबून

K. S. Azad
K. S. Azadesakal

लेखक : के. एस. आझाद

अन्नही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक असणारी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरून काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे.

शरीर पोषण व संवर्धनासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्वे व खनिज द्रव्ये यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात आले पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात मिळणे आवश्यक आहे.

मानवी अवस्थेतील सर्वांत महत्त्वाची म्हणजे जन्मानंतरची अवस्था होय. या अवस्थेतल्या सुरुवातीच्या काही वर्षांतच मुलांची भविष्यातील शारीरिक व मानसिक स्थिती अथवा त्याचा विकास सुदृढरीत्या होणार आहे की नाही याची काही प्रमाणात चिन्ह दिसतात.

त्यामुळे या वयामध्ये आहार अत्यंत महत्त्वाचा आहेच पण तो कसा आहे? यावर बरंच काही अवलंबून आहे. (saptarang latest marathi article by KS Azad on Mental intellectual development depends on children diet nashik news)

K. S. Azad
जाणिवांचा नाद!

आहार आणि आजार यांचा फार जवळचा संबंध आहे. बरेचसे आजार, व्याधी, विकृती याचे मूळ कारण अयोग्य आहार हेच आहे. लहान मुलांच्या शारीरिक किंवा बौद्धिक वाढीसाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत.

सगळ्यांना आपली मुले सशक्त, अत्यंत हुशार, खेळात प्रवीण असावीत असे वाटते. पण हे जादू प्रमाणे घडू शकत नाही. मुलांचा मेंदू तल्लख होण्यासाठी त्यांना सुदृढ करण्यासाठी चांगला पोषक आहार घेण्याची सवय पालकांनी लावणे आवश्यक असते.

प्रामुख्याने लहान मुले या सवयी स्वतः अनुभवून आणि मोठ्यांना पाहून शिकतात. प्रत्यक्षात लहानपणापासून तो आहार त्याचे महत्व मुलांना समजेल, या भाषेत सांगत त्यांना खायला परावृत्त करणे हे पालकांचे कर्तव्य होय.

सर्वसाधारणपणे सुरुवातीचे दोन-तीन वर्षे मुलांचे खाणे घरीच असते. शाळा सुरु झाल्यावर डबा सुरू होतो. डबा आवडीचा नसला तर तसाच्या तसा परत येतो, असा अनेक पालकांचा अनुभव असतो. अर्थात आवड निवड तयार होण्यामागे बऱ्याचशा प्रमाणात पालकही जबाबदार असतात.

हल्ली बरीच मुले घरातल्या व इतर व्यक्तींचे पाहून लहान वयातच चहा-कॉफी पिऊ लागतात. कोकोपासून बनवलेले चॉकलेट हे मुलांना तर फारच प्रिय असते. पण तिन्ही पदार्थ मेंदूला उत्तेजना देणारे आहे.

चहा-कॉफी, चॉकलेट खाऊन उत्तेजित झालेल्या मेंदूमुळे एकाग्रता कमी होऊ शकते. चॉकलेट ही आवडती वस्तू असली तरी मुलांमध्ये त्याचे प्रमाण अत्यंत कमी ठेवावे.

K. S. Azad
आपत्कालीन वॉररूम!

आजकाल हॉटेलिंगचे प्रमाण वाढले आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर मुले आईस्क्रीम व सॉफ्ट ड्रींक मागतातच. मग ऋतू कोणताही असो चटक-मटक काहीतरी खाण्यासाठी डोसा, उत्तप्पा, वडा मागिविले जाते.

एखाद्या वेळी या गोष्टी खाणे ठीक आहे. पण मुलांच्या आरोग्याची काळजी न घेता प्रत्येक वेळी मुले मागतील ते दिलेच पाहिजे, हे योग्य नव्हे. या वयामध्ये शरीरातील धातू निर्माण होत असतात. त्यामुळे खानपानाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

आधुनिक संशोधनानुसार मेंदूची व डोळ्यातील नेत्र पटलाची रचना योग्य प्रमाणात होण्यासाठी टोरीन हे द्रव्य आवश्यक आहे, आणि ते दुधातून भरपूर मिळते. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांनी दूध नियमित प्यायला हवे.

दीड ते तीन वर्षे वयाच्या मुलांमध्ये नकारात्मक भूमिका आढळते. म्हणजेच तुम्हाला जे करावे, असे वाटत असेल ते नेमके त्याच्या विरोधात वागतात. अशावेळी त्यांना खाण्याची सक्ती करू नका.

बाळाला त्याच्या हाताने खायला शिकवा खाण्याच्या वेळा ठरविणे अवघड असले तरी बऱ्याच बालकांना एका विशिष्ट वेळेत भूक लागते ती वेळ ओळखून मगच खायला द्या. शक्यतो लहान मुले झोपेतून उठल्यानंतर आपण त्यांना दुधाचा आग्रह करतो किंवा बाळाने खावे म्हणून त्याला चॉकलेट चिप्सची लाच देऊ पाहतो.

लक्षात ठेवा लहान मुले या वयात अनुकरण करतात जर पालकांच्या सवयी खराब असतील तर ते मुले कुठून शिकणार? जेवताना टीव्हीसमोर बसून अथवा मोबाईल हातात धरून जेवण हे कटाक्षाने टाळले पाहिजे.

योग्य पदार्थाची निवड करून द्या. आपण खात असलेल्या सर्व गोष्टी मुलांनी खाव्यात, असे नाही. मुलांवर खाण्यासाठी जबरदस्ती करू नये. त्यांना आवडेल ते खाऊ द्यावे. त्यामुळे त्यांना कोणते पदार्थ योग्य आहेत, याची निवड करता येते.

यासाठी आपण मार्गदर्शन जरूर करावे, पण तेही हसत खेळत वातावरणात झाल्यास उत्तम. मुलांना निरोगी व पोषण आहार घेण्याची सवय शिकवण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमचे प्रयत्न सोडू नका. तुम्ही प्रयत्न करत राहिल्यास मुलांच्या सवयी बदलू शकतात.

कधी-कधी जेवणात कोणती भाजी असावी हे मुलांना चॉईस करू द्या. त्यामुळे ते जंग फूड खाणे टाळतील. गरज असेल तेवढेच खायला द्यावे. मुलांना गरज असेल तेवढेच खायला द्यावे. मुलांना त्यांच्या भुकेनुसार जेवायला शिकवावे. पालकांकडून प्रेमापोटी क्षमतेपेक्षा अधिक आहार दिला जातो. त्यामुळे अपचन होऊ शकते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

K. S. Azad
सागरी पक्षी

मुले शारीरिकदृष्ट्या चपळ असतात. त्यांची सातत्याने काहीतरी मस्ती, पळापळ चालू असते. म्हणूनच मुलांना दोन जेवणाव्यतिरिक्त काहीतरी खावेसे वाटणे साहजिक आहे. अर्थात एकसारखे खात राहण्याची सवय चांगली नसली तरी भूक लागेल तेव्हा निश्चितच द्यावे.

डब्यामध्ये रोज भाजी पोळी न्यायला मुलांना आवडत नाही. म्हणून मुलांना आवडेल व त्यांच्यासाठी पोषक काही असेल असा डबा असायला हवा बऱ्याच शाळांमध्ये पूर्ण दिवसाला दोन सुट्ट्या असतात.

एक छोटी तर दुसरी मोठी. दोन्ही सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिल्या तर मुलांनाही तेच तेच खाण्याचा कंटाळा येत नाही. रात्रीचे जेवण लवकर द्यावे म्हणजे मुले सकाळी लवकर उठू शकतील. त्यामुळे वर्गात शिक्षकांचे शिकवणे योग्य रितीने समजण्यास मदत होऊ शकते. 

(लेखक क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

मुलांच्या आहारात हे असायला हवे 

केशर, मनुका, डाळिंब, काळे खजूर, काळे ऑलिव्ह,सफरचंद, गूळ

दूध, लोणी, सुके अंजीर, खारीक, मूग, तूर डाळ, मूग, मटकी, मसूर, चणे वगैरे कडधान्ये

गहू, डिंक, खसखस, नाचणी

पंचामृत, लोणी, तूप, बदाम, अक्रोड, जर्दाळू

तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी

द्राक्षे, शहाळी, ओला नारळ, गोड मोसंबी, पपई, आंबा.

ताज्या हिरव्या भाज्या, काकडी, गाजर, कोशिंबिर, मध 

K. S. Azad
संवाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com