दृष्टिकोन : कलेच्या माध्यमातून घडवा सुंदर जीवन

आपल्यामधील कला एखाद्या छंदापुरती मर्यादित न राहता त्यामधून जर करिअर शकले, तर तो जणू दुग्धशर्करा योग होऊ शकतो....
Rajaram Pangavhane
Rajaram Pangavhaneesakal

लेखक : राजाराम पानगव्हाणे

आपल्या आयुष्यात कला ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला अथवा गुण असतात. कुणी ते प्रकट करतात तर कोणामध्ये हे गुण सुप्त स्वरूपात असतात. आपण आपल्यातील कला सादर करण्याची आवश्यकता आहे.

कला ही जीवनामध्ये आनंद निर्माण करते. आपले जीवन सुखकर, निरामय, ताणतणाव मुक्त करण्यासाठी मदत करते. विशेष करून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण महाविद्यालयांच्या विविध व्यासपीठांवर नेहमी करायला हवे.

आपल्यामधील कला एखाद्या छंदापुरती मर्यादित न राहता त्यामधून जर करिअर शकले, तर तो जणू दुग्धशर्करा योग होऊ शकतो.... (saptarang latest marathi article by rajaram pangavhane on Create beautiful life through art nashik news)

कला ही जीवनामध्ये आनंद निर्माण करते.
कला ही जीवनामध्ये आनंद निर्माण करते.esakal

छंद आणि अंगीभूत कलांच्या माध्यमातून करिअर घडविलेली अनेक यशस्वी उदाहरणे आहेत. ज्यांनी महाविद्यालयीन शिक्षण करत असताना कलेला अधिक प्राधान्य दिले व कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये पारंगत होऊन जागतिक पातळीवर स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली.

कॉलेजमधील सांस्कृतिक महोत्सव म्हणजे खरे तर विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ आहे. युवा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे. आपल्यातील कला सादर केली पाहिजे. नृत्य, संगीत, गायन, नाटक, अभिनय यामध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सक्रिय व्हावे.

याकडे केवळ छंद म्हणून न बघता आपले करिअर म्हणूनही बघता येऊ शकते. शिवाय व्यक्तिमत्त्व विकासासाठी सगळ्याच कला अत्यंत उपयुक्त ठरतात. प्रत्यक्ष कला सादरीकरण व बॅक स्टेज या दोन्ही शाखांमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

यात स्वयंरोजगाराच्याही अनेक संधी दडलेल्या आहेत. स्वतःचे उद्योग उभारून देखील करिअर यशस्वी करू शकता. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कलेची सेवा केल्यास मिळणारा आनंद हा अतिशय दिव्य स्वरुपाचा असतो. ज्या आनंदाचा शोध सध्या लोक सर्वत्र घेत आहेत, तो आनंद कलेच्या माध्यमातून निश्चितपणाने मिळू शकतो. 

Rajaram Pangavhane
भीमबेटका : सृजनात्मक अभिव्यती

एखाद्या नाटकासाठी काही जण अभिनयाद्वारे विविध पात्र साकारत असतील, तर तेथे साऊंड, लाईट, स्क्रिप्ट रायटिंग, दिग्दर्शन, निर्माता, ड्रेस डिझायनर, मेकअप आर्टिस्ट अशा अनेक क्षेत्रात कामाच्या संधी उपलब्ध असतात.

यासाठी शिक्षण देणाऱ्या काही व्यावसायिक संस्था देखील आहेत. नृत्य दिग्दर्शन म्हणजेच कोरिओग्राफी मध्ये अनेक करिअरच्या संधी आहे. नृत्य करताना आवश्यक असणारे कॉस्ट्यूम याच्या मेकिंगमध्ये सुद्धा संधी आहेत.

यामध्ये अलीकडच्या काळात हे क्षेत्र अत्यंत विस्तृत होत आहे. तंत्रज्ञानामुळे ते अधिक सोपे झाले तसेच आव्हानही वाढत आहेत. पण दुर्दैवाने विद्यार्थी अधिक वेळ मोबाईलमध्ये घालवत असल्यामुळे या कलांकडे अलीकडच्या काळात संधी असूनही दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांत सतत सहभागी होत राहिल्यास व्यक्तिमत्त्वाचा विकास आपोआप होऊ लागतो. नृत्य-नाट्य-संगीत हा मनुष्याच्या जीवनाचा अनन्यसाधारण भाग आहे. मानवाच्या जीवनातून कला जर दूर केली तर आयुष्य निरस होऊन जाईल.

जीवनात रोजच्या धकाधकीतून बाहेर पडायचे असेल तर या अभिजात कलाच मनुष्याला तारक ठरतात. आपण सर्वसाधारणपणे निरीक्षण केले तरी लक्षात येईल की, बुध्दिमान माणसाचा वेळ हा काव्य-विज्ञान-करमणूक यांच्या आनंदग्रहणात जातो. तर मूर्खांचा वेळ हा वाईट गोष्टींची संगत, झोप, नाहीतर भांडणात जातो. 

जीवनात कलेचे महत्वाचे स्थान आहे. या कलेची योग्य जाण विद्यार्थ्यांच्या लहानपणातच निर्माण केली पाहिजे. चांगले बघणे, चांगले वागणे, चांगले लिहिणे आणि चांगले व्यक्त होणे हे आपण स्वतःमध्ये रुजविले पाहिजे.

काही वर्षांपूर्वी या क्षेत्रात संधी कमी प्रमाणात उपलब्ध होत्या. आता टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून नृत्य-संगीत-नाट्य यावर आधारित कार्यक्रम-स्पर्धा सतत सुरू असतात. त्यामुळे संधी मुबलक उपलब्ध आहेत. 

Rajaram Pangavhane
राजवंश भारती : विस्तीर्ण भारतीय कालपट...

सांस्कृतिक कार्यक्रमांतून खालील प्रमाणे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
       
१) एकावेळी अनेक विद्यार्थी- विद्यार्थीनींना व्यासपीठावर जाण्याची संधी मिळते.
२) सुप्त गुणांची जाणीव होते. सहकारी, शिक्षक आणि समाजाला हे सुप्त गुण कळतात.
३) समूह नृत्य-गीत गायनामुळे व्यासपीठावर जाण्याची भीती दूर होते. सभा धीटपणा अंगी येतो.
४) आपल्या समृद्ध वारशाची जाणीव विद्यार्थ्यांना होते.
५) भावना उद्दिपित करणारे प्रसंग-पोषाख-भडकपणा हे म्हणजेच करमणूक हे समीकरण बदलून क्लासिकल् बघण्याची, ऐकण्याची सवय लागते.
६) भावनिक परिवर्तनाच्या काळात शारीरिक, मानसिक उर्मीला योग्य काम मिळते. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करण्यास मदत होते.
७) अभिनय करणाऱ्या कलाकारांना वारंवार स्टेजवर यावे लागते. पोषाख, रंगभूषा (मेक-उप) करावी लागत असते. यामुळे परस्पर मदत-संवादाची सवय होते. वेळेच्या नियोजनाची सवय लागते.
८) विषय निवड, विद्यर्थिनींची निवड, निवेदन लिखाण यासाठी सांस्कृतिक मंडळातील शिक्षकांत
विचारांची देवाण-घेवाण वाढते.
९) विद्यार्थी शिक्षक यांच्यातील अंतर कमी होते.
१०) त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला कार्यक्रमासाठी वेळ द्यायचा आहे, असे विद्यार्थ्यांच्या लक्षात
येते, तेव्हा अभ्यासासाठी उपलब्ध असलेला वेळ ते अतिशय योग्य प्रकारे वापरतात.
११) संगीत आणि नृत्यामुळे एकाग्रता वाढते.
१२) गेल्या १० वर्षांत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग वाढलेला दिसला आहे.


उल्लेख केलेल्या मुद्यांसह अजूनही अनेक फायदे कला सेवेतून निश्चितपणाने मिळतात. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागाबद्दल त्या घडीला अत्यंत उत्सुकता वाढलेली दिसते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन छंद जोपासून विद्यार्थ्यांनी तर पुढे आले पाहिजे.

पण त्यांच्याबरोबरच पालक व शिक्षक यांचीही फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी आपले पाल्य व विद्यार्थी यांच्यामधील सुप्त गुण काय आहे? हे त्यांनी त्यांच्या देहबोलीतून ओळखले पाहिजे जर त्यांच्या कमी वयामध्ये हे जर ओळखले गेले नाही तर त्या त्यांच्यातील कलेला भविष्यात वाव मिळण्याची शक्यता कमी कमी होत जाते.

त्यातून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. एखादी कला अशी असू शकते, की त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ओळख जागतिक पातळीवर सुद्धा देऊ शकते.

जर या क्षमता शिक्षकांनी किंवा पालकांनी वेळीच ओळखून या अंगभूत कलागुणांना योग्य वेळी, योग्य पद्धतीने वाव देण्याची गरज सध्याच्या काळात दिसून येते. कलेबद्दलचा हा दृष्टिकोन उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठीही अत्यंत मोलाचा आहे. 

(लेखक ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत)

Rajaram Pangavhane
पसायदान : मानव्याचे उत्कट, भव्य निधान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com