दगडांच्या देशा : आपल्याला भेटलेली माणसे हीच आपली संपत्ती

Saptarang article
Saptarang articleesakal

के. सी. पांडे

शिकणे ही आयुष्यभर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती सतत चालू राहिली तरच मनुष्याची प्रगती होते. विकासाचा मार्ग सुकर होतो. तसेच हवे ती गोष्ट तो प्राप्त करू शकतो. अशामुळे शिकणे प्रत्येकाची गरज आहे. तुम्ही उद्योजक, विद्यार्थी, नोकरदार शिक्षक, वकील, सीए, आयटी प्रोग्रामर, राजकीय व्यक्ती अथवा खेळाडू असा अगदी कोणीही असो मात्र शिकणे ही प्रत्येकाची गरज आहे.

त्यासाठी प्रत्येक वेळी शाळा महाविद्यालयातच गेले पाहिजे असे काही नाही.माणूस अनुभवाने शिकत जातो.गारगोटी सारख्या उद्योग विश्वास मी काम करत असताना हे जगा वेगळं क्षेत्र होतं. यात मला अनेक लोकांचा संपर्क आला वेगवेगळ्या देशाची वेगवेगळ्या परंपरेची निरनिराळा धर्म असणारी अशा अनेकांशी सहवासातून मला चांगले व कटू अनुभव आले. या अनुभवातून मी शिकत गेलो. माणसे ओळखायला शिकलो.

माणसे जपायला शिकलो आणि यातूनच माझी प्रगती झाली. तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात राहून चांगला माणूस बनू शकता. यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहून माणूस यशस्वी बनायला शिकतो. पैसेवाल्या लोकांच्या संगतीत राहून त्याला आर्थिक मार्गाचे दर्शन होते. जिथे जाईल तिथे माणूस कळकळत बरेच काही शिकत असतो. (saptarang marathi article on dagdanchya desha by kc pandey nashik news)

Saptarang article
सावित्रीची लेक

अध्यात्मिक लोकांच्या उपस्थितीत त्याला शांततेचे दर्शन प्राप्त होते. निसर्गाच्या वास्तव्यात त्याला विश्वाची रहस्य समजू लागतात. मला अनेक प्रकारचे लोक भेटली यात प्रामुख्याने समाजातील प्रतिष्ठित लोकांचं अधिक प्रमाण होतं. त्यांना माझ्याबद्दल वाटलेला आकर्षण यामुळेच त्यांनी माझ्याशी जवळीक केली.एखादा व्यक्ती एकट्या जीवावर स्वतःच्या कर्तुत्वावर जगात अशी ओळख कशी निर्माण करू शकतो.

असं कसं त्यांना नेहमी वाटत असे. भारतीय लोकशाहीमध्ये राजकीय व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण देश चालवण्याचे प्रशासन चालवण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे आहे. असे लोक कायम ग्लॅमरमध्ये राहतात. पण ते माझ्या ग्लॅमरचे फॅन झाले ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. अशा शासकीय अधिकाऱ्यांकडून उदाहरणार्थ आयपीएस, आयएएस, सचिव दर्जाची तसेच वरिष्ठ राजकीय नेते यांच्याशी माझी खूप चांगली मैत्री झाली.

या मैत्रीमध्ये मला खूप चांगले अधिकारी व नेते भेटले की ज्यांच्याकडून मला शिकायला मिळाले. विशेष करून युनिफॉर्म मध्ये असलेले अधिकारी यांच्याकडून शिस्त मिळाली. नेव्हीचा मला बॅकग्राऊंड असल्यामुळे माझ्याकडे शिस्त होतीच. पण त्यात अधिक भर पडली.

राजकीय नेत्यांकडून प्रत्येकाशी कसे बोलावे कसे वागावे नम्रपणा कसा असावा, साधेपणा हे चांगले गुण मी घेतले. या सर्व गुणांचा मला गारगोटीच्या वाटचालीमध्ये खूप फायदा झाला. अशा सन्माननीय लोकांचा मी कायम मनस्वी आभारी आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Saptarang article
दक्षिणेचे ‘उत्तर’!

शिकण्याची ही प्रक्रिया आईच्या पोटात गर्भावस्थेत असल्यापासून सुरू होत असल्याने असल्याचे विज्ञानाने आधीच मान्य केले आहे. महाभारतात सुद्धा अभिमन्यू आई द्रोपदीच्या पोटात असताना चक्रव्यूहामध्ये कसे जायचे ही कला शिकला होता. जन्माच्या आधीपासून सुरू झालेली शिकण्याची निरंतर प्रक्रिया माणसाचे अस्तित्व आहे तोपर्यंत चालूच राहते.

आईच्या पोटात असताना किंवा लहान असताना तो जे काही शिकतो ते एक नैसर्गिक प्रक्रिया असते. या प्रक्रियेत तो आपोआप शिकत जातो उदाहरणार्थ चालणे बोलणे खाणे अशा काही गोष्टी आहेत तो स्वतःहून ग्रहण करतो. मात्र अक्षर ओळख, गणिते आर्थिक व्यवहार करणे यासारख्या मानवनिर्मित गोष्टी त्याला नैसर्गिक पद्धतीने शिकता येत नाही.

त्यासाठी त्याला बाहेरून प्रयत्न करावे लागतात या गोष्टी आपोआपच होत नाही. प्रत्येक जण आपापल्या प्रयत्नाने साध्य होईल तेवढे यश संपादन करतो. नैसर्गिक गोष्टीत प्रत्येकजण शंभर टक्के यश प्राप्त करतो कारण या गोष्टी आपोआप होत असतात. प्रत्येक जण चालायला शिकतो म्हणजे 100% चालतो मात्र निसर्ग यात भेदभाव कधी करत नाही.

प्रत्येकाला तो संपूर्ण क्षमता बहाल करतो मात्र माणसाला वैयक्तिक साध्य करताना त्याच्या प्रयत्न इतकेच यश मिळते हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे कोणी कमी अधिक असेल तर त्यामध्ये तुझ्या भेदभाव कधीही करू नये. प्रत्येक जण त्या क्षमतेनुसार तो काम करीत असतो शालेय महाविद्यालय शिक्षणानंतर आपल्याला जीवनातील एक फार मोठा अभ्यासक्रम शिकायचा असतो. तसेच स्वतःचा उद्योग सुरू केल्यानंतर शिकावं लागणार्‍या गोष्टी असो एकंदर प्रत्येकाला रोज रोज काहीतरी शिकावेच लागते.

Saptarang article
माझिया माहेरा : संस्कारांचं मंदिर

प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगात तंत्रज्ञानात होणारे बदल आत्मसात करावी लागतात. कायदे बदलली की सामाजिक संकेत बदलतात. त्यानुसार अनुशिलन करण्यास शिकावे लागते. एकंदरीतच शिकण्याचा व ज्ञान आत्मसात करण्याच्या गोष्टीवर आपल्या विकासाचा व प्रगतीचा दर अवलंबून असतो, म्हणून शिकण्यासाठी सोप्या प्रक्रिया कोणत्या त्या प्रभावी कशा करता येतील त्या सर्वसमावेशक कशा असतील याचा आपण विचार केला पाहिजे माणसे ओळखायला शिका.

आपल्यातील ऊर्जा आपल्या त्याचे स्त्रोत हे आपल्या ज्ञानातून अनुकरणातून दिसले पाहिजे हे मात्र कशामुळे येते हे आपण लक्षात घेतले पाहिजे जसजसं तुम्ही समाजाचा अनुभव घ्या जसजसे माणसांचा तुम्हाला अनुभव मिळेल त्यामुळे आपल्याला भेटलेली माणसे हीच आपली संपत्ती आहे. उपलब्ध असलेली माणसे सांभाळल्यास आपल्या वाटचालीत यश नक्कीच मिळेल ही खात्री बाळगावी.

आपल्या माणसांवर विश्वास ठेवावा विश्वास ठेवणं व एखाद्याला माफ करणार या इतका श्रीमंतपणा दुसरा कुठलाही नाही हे औदार्य आपल्याला दाखवता आले पाहिजे. त्यामुळे माणसांच्या संपत्तीचे जपणूक करा.पुढे जा निश्चिती यश तुम्हाला मिळेल याबद्दल तीळ मात्र शंका नाही असे माझे ठाम मत आहे.

Saptarang article
बोलभांड तोंडांची टकळी बंद करायला हवीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com