दगडांच्या देशा : जगाच्या पाठीवर गारगोटीची वेगळी ओळख

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackerayesakal

लेखक - के. सी. पांडे

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची आस असते. पण, यशस्वी होणे म्हणजे नेमके काय? तर, आपल्या मनातून आपण ठरवलेले ध्येय आपण साध्य करणे म्हणजे यशस्वी होणे. मात्र असे अनेकांच्या बाबतीत घडत नाही. ध्येय तर अनेक लोक ठरवतात. पण, ते पूर्ण मात्र करू शकत नाहीत. यामागे बरे कारण काय असेल…? खरेतर येथेच मेख आहे. आपण यशस्वी का होत नाही, यावर विचार करण्यापेक्षा आपण यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे, याचे नियोजन चोख करायला हवे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चिती फार आवश्यक आहे. यावर आपली सर्व वाटचाल अवलंबून असते. नौदलातून सेवानिवृत्तीनंतर मी लगेचच गारगोटी व्यवसाय वाढविण्यासाठी परदेशात निरनिराळ्या ठिकाणी भेट देणे सुरू केले. त्यातून हा व्यवसाय वाढविला, घडविला. याकरिता सर्व प्रकारच्या अडचणी, संघर्ष माझ्या वाट्याला आले. त्यात सर्वांत महत्वाची बाब होती, ती म्हणजे आर्थिक नियोजन. निवृत्तीनंतर नौदलाकडून मला मिळालेली दोन लाख 75 हजार रक्कम माझ्या हातात होती. त्यावेळी पे कमिशन लागू नव्हते. त्यामुळे मिळणारी रक्कम कमी मिळाली. परदेश दौरा केल्यानंतर आणि भारतात व्यवसाय करताना आलेल्या अनुभवानुसार आपल्याकडची सर्व गारगोटी ही एकाच छत्राखाली असली पाहिजे, याची जाणीव मला झाली. गारगोटी जसजशी प्रसिद्ध व्हायला लागली, तसतसे प्रश्न मला समाजातून अनेक विचारले गेले. त्यामुळे गारगोटीची स्थापना कायमी स्वरूपी करायचे मी ठरविले. म्हणूनच मी नाशिकमध्ये गारगोटी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय निर्माण करण्याची मनाशी खूणगाठ बांधली. कल्पना प्रत्येक जण करत असतो. पण त्या प्रत्यक्षात उतरविणे, ही असामान्य गोष्ट खूप कमी किंवा क्वचितच एखादा करतो, तोच जगप्रसिद्ध होतो. यासाठी मनोधैर्य गरजेचे आहे. गारगोटी ही अगोदरही होती, पण या माध्यमातून माझे गारगोटीचे व विविध प्रदेशातील ओळख हा एक प्रकारे माझा यूएसपी तयार झाला. नाशिकहून माझ्या गावाला जाणारी रेल्वे, कॅन्टोन्मेंट बोर्ड, लष्करी वसाहत, एचएएलमध्ये सेवानिवृत्त सैनिकांना असलेली नोकरीतील संधी यामुळे स्थायिक होण्यासाठी मी नाशिकला प्राधान्य दिले. त्यानुसार घरही सेवा कालावधीतच घेतले होते. नाशिक, पुणे व शिर्डी या महामार्गावर माळेगाव एमआयडीसी सिन्नर येथे अंदाजे पंधरा हजार स्क्वेअर फूटचे दोन प्लॉट मी घेतले व त्यावर गारगोटी संग्रहालय उभे करण्याचे ठरविले.

Balasaheb Thackeray
प्रेरणादायी स्मारक!
Gargoti Museum
Gargoti Museumesakal
Gargoti Museum
Gargoti MuseumEsakal

1995 ते 98 या तीन वर्षांच्या कालावधीत संग्रहालय उभारणीचे काम सुरू होते. संग्रहालय उभे करण्याचा जेव्हा मी निर्णय घेतला, त्यावेळी मला पूर्ण विश्वास होता, की हे संग्रहालय मला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देईल. या संग्रहालयास देशातील व परदेशातील नामवंत मान्यवर वारंवार व नियमितपणे भेट देतील. लौकिकास साजेशी संग्रहालयाची रचना करण्याचे मी ठरविले. संग्रहालयामध्ये प्रवेश करतानाच भारत मातेचा भव्यदिव्य असा पुतळा उभारण्यात आला. मी सैनिक असल्यामुळे भारत मातेबद्दल मला नितांत आदर होता व आजही आहे. संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर पृथ्वीवर विराजमान झालेल्या भारत मातेच्या मूर्तीकडे बघताना आपली मान वर झाली पाहिजे. इतक्या उंचीची मूर्तीची स्थापना तेथे केली. जेणेकरून सैन्यामध्ये हनुवटीवर करून बघता ''चीनअप'' व ''चेस्टअप'' अशी ऑर्डर म्हणजे एक प्रकारे सन्मान होय. संग्रहालयात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मध्ये जो जिना आहे. तोही वास्तु शिल्पातील एक उत्कृष्ट नमुना आहे. आर्किटेक्टेचरच्या भाषेत संग्रहालयाची रचना ही डेझर्ट स्ट्रक्चरची आहे. याचे कारण असे, की मी सर्वप्रथम तूशान अमेरिकेतील भागास भेट दिली होती. तेथील मिनिरल गारगोटी संग्रहालयातून मला जागतिक स्तरावर ओळख निर्माण होण्यास सुरुवात झाली. तो तुशान परिसर हाही डेझर्ट वाळवंट परिसर जसा आपल्याकडे राजस्थानातील जैसलमेर आहे, तसाच आहे. त्यामुळे माझ्या गारगोटी संग्रहालयाची रचना तशीच असावी, हा माझा हेतू होता आणि तो यशस्वी झाला.

Balasaheb Thackeray
सही साक्षर व्हा!
Gargoti Museum
Gargoti Museumesakal

जगाच्या पाठीवर या आगळ्यावेगळ्या म्युझियमची ओळख गारगोटीमुळे तर आहेच पण त्याचबरोबर संग्रहालयाची रचना हे देखील एक वेगळेपण आहे. जगातील प्रसिद्ध अससेल्या नामवंत वास्तू याच स्ट्रक्चरप्रमाणे निर्मित केल्याचे आपणास आढळेल.

(लेखक हे सिन्नर स्थित आंतरराष्ट्रीय गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com