'डाएटच्या बाबतीत चोखंदळ' (साकीब सलीम)

saqib saleem
saqib saleem

माझ्या चित्रीकरणाची वेळ मला एक दिवस आधीच कळते. त्यामुळं मी सकाळी उठल्यावर सगळ्यांत आधी माझ्या जिमची वेळ ठरवतो आणि नंतरच दिवसभरातल्या बाकीच्या गोष्टींचं वेळापत्रक ठरवलं जातं. मी एकही दिवस व्यायाम करणं टाळत नाही. आठवड्यातले पाच ते सहा दिवस मी व्यायाम करतोच; पण कधी कधी आठवड्यातले सातचे सात दिवसही वर्कआउट करतो. कारण मला वाटतं आपण आपल्या शरीराला नेहमीच कार्यरत ठेवलं पाहिजे.

बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधी मी मॉडेल होतो. मॉडेलिंग आणि ऍक्‍टिंग ही दोन्ही वेगवेगळी प्रोफेशन्स आहेत आणि या दोघांमध्ये फार फरक आहे. मॉडेलिंगनं माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण कार्य केलं. मला अभिनयात करिअर करण्यासाठी मॉडेलिंगचा फार उपयोग झाला. त्यासाठी मॉडेलिंगमधून मी पदवी मिळवली आणि जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरवात केली. त्यानंतर हळूहळू चित्रपटांकडे वळू लागलो. सध्या मी "83' चित्रपटासाठी काम करतो आहे. त्यात मी मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारत आहे. कबीर खान हा चित्रपट करत आहेत हे मला कळलं, तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी माझा लूक टेस्ट आणि ऑडिशन घेतली. त्यानंतर सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला क्रिकेट कसं आणि किती चांगलं खेळता येतं हे पाहिलं. त्यानंतरच त्यांनी माझी या चित्रपटासाठी निवड केली. नुकतंच आम्ही या चित्रपटासाठी धर्मशाळा इथं ट्रेनिंगसाठी गेलो होतो. तिथं आम्ही फंक्‍शनल ट्रेनिंगसुद्धा केले आणि जिम वर्कआउटही केलं. धर्मशाळा इथं कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, मदन लाल, यशपाल शर्मा आणि बलविंदरसिंग संधू या पाच अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींनी आम्हाला प्रशिक्षण दिलं. या चित्रपटासाठी मी सध्या फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देत आहे. चित्रपटात मी क्रिकेटपटू वाटण्यासाठी फार तयारी केली. वजन कमी करण्यासाठी मी किक बॉक्‍सिंग सुरू केलं.

मी दिवसभरातून एक ते दीड तास वर्कआउट करतो. मी जास्तीत जास्त दुपारच्या वेळेत जिम करण्यासाठी प्रयत्न करतो. कारण दुपारच्या वेळेत जिममध्ये गर्दीसुद्धा कमी असते आणि वर्कआऊट करताना शांतताही मिळते. सध्या चित्रपटात मी क्रिकेटपटूची भूमिका करत असल्यानं त्यासाठी मी कार्डिओमध्ये येणारे सगळे वर्कआउट करतो. त्याबरोबर फंक्‍शनल ट्रेनिंगकडंही मी सध्या जास्त लक्ष देत आहे. किक बॉक्‍सिंगकडं तर माझं लक्ष आहेच.

"चार ते पाच वेळा खातो'
दिवसभरात मी चार ते पाच वेळा खातो. चिकन, अंडी, पनीर, हिरव्या भाज्या असे जास्त प्रोटिन्स असलेले पदार्थ मी खातो. वर्कआऊट करताना ताकद वाढावी म्हणून हाय प्रोटिनचे पदार्थ मी खात असतो. मला मासे खूप आवडतात. त्यामुळं त्यांचादेखील माझ्या डाएटमध्ये समावेश असतो. माशांमध्ये प्रोटिन्सचं प्रमाणही अधिक असतं. माझ्या डाएटमध्ये मी साखरेचं प्रमाण कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण जास्त साखरेचे धोके अधिकच आहेत. मी माझ्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घेत असतो आणि डाएटच्या बाबतीत तर मी फारच चोखंदळ आहे. मला वाटतं प्रत्येक भूमिकेसाठी वेगवेगळे डाएट प्लान असतात. यापूर्वी मी "रंगबाज' या वेब सिरीजसाठी काम करत होतो, तेव्हा त्यासाठी मला वजन वाढवावं लागलं होतं. त्यामुळं वजन वाढवण्यासाठी माझ्यासमोर जे पदार्थ येत होते, ते मी खात होतो आणि आताच्या चित्रपटात मी क्रिकेटपटूची भूमिका साकारत असल्यानं मला फिट राहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळं माझं डाएट मी व्यवस्थित पाळतो. मला घरचं जेवण खायला खूप आवडतं; पण कधी कधी आपल्याला काही तरी मिळवण्यासाठी त्याग करावाच लागतो.

व्यायाम अजिबात टाळत नाही
माझ्या चित्रीकरणाची वेळ मला एक दिवस आधीच कळते. त्यामुळं मी सकाळी उठल्यावर सगळ्यांत आधी माझ्या जिमची वेळ ठरवतो आणि नंतरच दिवसभरातल्या बाकीच्या गोष्टींचं वेळापत्रक ठरवलं जातं. मी एकही दिवस व्यायाम करणं टाळत नाही. आठवड्यातले पाच ते सहा दिवस मी व्यायाम करतोच; पण कधी कधी आठवड्यातले सातचे सात दिवसही वर्कआउट करतो. कारण मला वाटतं आपण आपल्या शरीराला नेहमीच कार्यरत ठेवलं पाहिजे. मी सगळे वर्कआउट करतो. प्रत्येक बॉडी पार्टवर आम्ही काम करतो. सायकलिंग आणि स्विमिंग मी कधी केलेलं नाही; पण कार्डिओ आणि किक बॉक्‍सिंगमधूनच माझं सगळं वर्कआऊट होऊन जातं. योगा आणि मेडिटेशनसुद्धा कधी केलेलं नाही; पण त्यानंसुद्धा शरीरावर खूप फरक पडतो. एक अभिनेता म्हणून मला भूमिकेनुसार वजन कमी आणि वाढवावं लागतं आणि आपण एखादी भूमिका निभावतो आहोत, तर त्यासाठी आपण किती फिट राहिलं पाहिजे आणि किती चांगल्या प्रकारे त्या भूमिकेत उत्कृष्ट दिसलं पाहिजे, हे बघणं ही माझी जबाबदारी आहे. वजन वाढवावं लागलं किंवा कमी करावं लागलं तर त्यासाठी आपल्याकडं वर्कआऊटशिवाय दुसरा पर्याय नसतो. मी आताच्या पिढीला असं सांगीन, की तुम्ही भरपूर खा. उगाच वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका. चांगलं खा, स्वस्थ राहा आणि फिट राहण्यासाठी वर्कआऊट करा. वर्कआऊट इज मस्ट.
(शब्दांकन : स्नेहल सांबरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com