अशी बोलते माझी कविता (सावित्री जगदाळे)

सावित्री जगदाळे, सातारा (९७६५९८८९९३)
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नामोहरम !
अताशा काळीज कसं हलतच नाही
संवेदना होत चालल्यात बोथट
मन सुन्न, बधीर झालंय
भाव-भावनांचा होत चालला आहे खडक...

टोचणी-बोचणी-खंत-सल-भरून येणं
कशाचंच काही वाटेनासं झालंय
किती घडतात घटना भोवताली
पण सगळंच
गाडलं जातंय कठीण कवचाखाली
काहीही मनात रुजेनासं झालंय

उलघाल-खदखद-तीळ तीळ तुटणं
काही उगवतच नाही दगडी मनावर
उदासीनतेचाही उठत नाही एखादा तरंग
किती दिवस राहावं जिवंत
कशाच्या बळावर राहावं जिवंत
आतल्या झऱ्यानं ?

नामोहरम !
अताशा काळीज कसं हलतच नाही
संवेदना होत चालल्यात बोथट
मन सुन्न, बधीर झालंय
भाव-भावनांचा होत चालला आहे खडक...

टोचणी-बोचणी-खंत-सल-भरून येणं
कशाचंच काही वाटेनासं झालंय
किती घडतात घटना भोवताली
पण सगळंच
गाडलं जातंय कठीण कवचाखाली
काहीही मनात रुजेनासं झालंय

उलघाल-खदखद-तीळ तीळ तुटणं
काही उगवतच नाही दगडी मनावर
उदासीनतेचाही उठत नाही एखादा तरंग
किती दिवस राहावं जिवंत
कशाच्या बळावर राहावं जिवंत
आतल्या झऱ्यानं ?

कुठून वाहावं...
कसं वाहावं
नामोहरम झालेल्या वाऱ्यानं ?

Web Title: sawitri jagdale's poem in saptarang

टॅग्स