Premium|Shahaji Raje Bhosale: शाहजीराजांच्या पराक्रमाची कहाणी; भातोडीच्या युद्धातील विजय

Deccan history: शाहजीराजे भोसले यांनी निजामशाही, आदिलशाही आणि मुघल सत्तांमध्ये वावरत दख्खनमध्ये व्यापक राजकीय व लष्करी प्रभाव निर्माण केला. गनिमी कावा, मुत्सद्देगिरी आणि धाडसी मोहिमांच्या जोरावर त्यांनी निजामशाहीचे पुनरुज्जीवन घडवून आणले.
Shahaji Raje Bhosale

Shahaji Raje Bhosale

esakal

Updated on

तत्कालीन बलाढ्य सत्ताधीशांकडे चाकरी करूनही स्वतंत्र ओळख निर्माण करणारे शाहजीराजे हे ‘किंगमेकर’ होते. त्यांच्या कारकिर्दीचे टप्पे व त्यातील प्रमुख लढाया महत्त्वपूर्ण आहेत. निजामशाहीतील झंझावात (१६२१ ते १६२४) इ.स.१५८० च्या दरम्यान विजापूरच्या आदिलशाही सैन्याशी कोल्हापूर येथे झालेल्या लढाईत निजामशाहीचे मातब्बर सरदार वणंगपाळ निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली मालोजीराजे व त्यांचे बंधू विठोजींनी अभूतपूर्व पराक्रम गाजविला. ही कर्तबगारी पाहून निजामशाहने मालोजींना ‘राजा’ किताबासह पुणे प्रांताची जहागिरी दिली तर वणंगपाळांनी आपली कन्या दीपाबाई हिचा हात त्यांच्या हाती दिला. त्यांना शाहजी व शरीफजी अशी दोन मुले झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com