
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
एका शेगडीवर लाल भडक तर्रीला उकळ्या फुटत असतात आणि आलेल्या गिऱ्हाईकांना त्यातूनच मिसळ बनवून दिली जात असते. दुसऱ्या शेगडीवर गरमागरम बटाटे वडे तळले जात असतात. ते कढईतून बाहेर पडत नाहीत तोवर संपतातसुद्धा. लोकांना दिसताना फक्त ग्राहकांची गर्दी दिसते पण पहाटे चार वाजता दिवस सुरू होतो आणि त्यानंतर दुपारी बारा-एक वाजेपर्यंत क्षणाचीही उसंत नसते. खारघरमधील सेक्टर-१२ मधील जुन्या गुरूद्वारा रोडवरील ‘श्री समर्थ मिसळ वडापाव सेंटर’ने फक्त आणि फक्त चवीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.