एक ‘माठवण’... (श्रीरंग जाधव)

श्रीरंग जाधव, ९९२१८७६३४०, shrirangjadhav68@gmail.com
रविवार, 26 मार्च 2017

आज माठ आणला एकदाचा.
लाल.
आता लाल हे का सांगितले... तर मागच्या वर्षी काळा आणला होता.
त्याच्यावर पाण्याचा शिंतोडासुद्धा उडवण्याच्या आत बायको म्हणाली, ‘‘अहो तुम्हाला खरंच कशातलेच काहीच कळत नाही, की मुद्दाम मला त्रास देण्यासाठी असे करताय?’’
‘‘आता काय झाले?’’ - मी.

आज माठ आणला एकदाचा.
लाल.
आता लाल हे का सांगितले... तर मागच्या वर्षी काळा आणला होता.
त्याच्यावर पाण्याचा शिंतोडासुद्धा उडवण्याच्या आत बायको म्हणाली, ‘‘अहो तुम्हाला खरंच कशातलेच काहीच कळत नाही, की मुद्दाम मला त्रास देण्यासाठी असे करताय?’’
‘‘आता काय झाले?’’ - मी.
‘‘अहो, काळे माठ फारसे पाझरत नाहीत.. थोडे जास्त भाजलेले असतात ना त्यामुळे. मग पाणी थंड कसे होणार? इतक्‍या साध्या-साध्या गोष्टी सुद्धा समजत नाहीत तुम्हाला म्हणजे कमाल आहे.. तरी लग्नाच्या वेळी मला पसंत करतानाच तेवढी देवाने सुबुद्धी दिली आणि नेमक्‍या त्याच वेळी माझ्या अकलेने कुठे दडी मारली कोणास ठाउक? आता तो माठ घ्या डोक्‍यात घालून नि हात पसरून उभे राहा एखाद्या शेतात... बुजगावणे म्हणून...तेवढे तरी नीट जमते का बघू.. सगळीकडे मीच मेले पाहिजे... तरच या घरात एखादी गोष्ट ठीक होणार ..’’
तर मित्र हो.. यंदा लाल माठ आणला तरी संवादात फरक इतकाच...
‘‘अहो लाल माठ नुसताच दिसायला चांगला... खरे थंड पाणी काळ्या माठातच होते... मी सांगितले होते की मागच्याच वर्षी... एवढे पण लक्षात राहत नाही म्हणजे कमाल आहे... तरी अजून आपली बायको कोण हे लक्षात आहे म्हणून ठीक आहे. नाही तर जाल कुठल्या तरी बयेचा हात धरून.’’
बाकी यंदाही बुजगावणे बनण्याची ऑफर कायम आणि बुद्धी व देवाबद्दलची तक्रार ‘सेम टू सेम’.
असो.
बायको म्हंजे बायको असते भावा...
आणि आपण नेहमीच...माठ!!
(दोन वर्षांपूर्वीची ‘माठवण’)

Web Title: shrirang jadhav write article in saptarang

टॅग्स