सर्वकाही खाते, पण प्रमाणात!

vaani kapoor
vaani kapoor

 स्लिम फिट - वाणी कपूर, अभिनेत्री
`बेफिक्रे’ या चित्रपटामुळे मला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली, मात्र त्या आधीपासून मी मॉडेलिंग करीत होते. या क्षेत्रात येण्यापूर्वी माझे वजन ७५ किलो होते. वजन कमी करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. पंजाबी असल्याने मी खूप फुडी आहे. माझा डाएटवर विश्‍वास नाही. मला जे पदार्थ आवडतात, ते मी खाते. फक्त योग्य प्रमाणात आणि त्यामध्ये हेल्दी गोष्टी आहेत ना, याची खात्री करूनच ते पदार्थ मी खाते. त्यामुळे मी सर्व प्रकारचे पदार्थ खाते, फक्त खाणे कमी प्रमाणात असते. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतील असे पदार्थ मी खाते. यामध्ये फळे आणि भाज्या यांचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच फळांचा ज्यूस आणि खूप प्रमाणात पाणी पिते. यामुळे माझी त्वचा आणि शरीर चांगले राहते. 

मला सर्वच गोष्टी खूप साध्या, सरळ ठेवायला आवडतात. मी जीमची मोठी चाहती नाही. त्यामुळे ही गोष्टही मी साध्या पद्धतीनेच करते. आठवड्यातून मी ४ वेळा जीमला जाते. यामध्ये मी कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग करते. ताणतणाव दूर करण्यासाठी मी योगासनांचा आधार घेते. यामध्ये स्ट्रेचिंगसारखे एक्सरसाईज करते, तसेच प्राणायमही करते. मला नृत्य करायलाही आवडते, त्यामुळे मी फिटनेसचा एक भाग म्हणून नृत्यही करत असते. या क्षेत्रात तुम्ही कसे दिसता, हेही महत्त्वाचे असल्याने मी माझ्या त्वचेची, केसांचीही विशेष काळजी घेते. मला लांब केस आवडतात. त्यामुळे केसांना वेळोवेळी मी बदाम तेलाने मसाज करते. त्वचेसाठी मी क्लिंझींग, टोनिंग आणि मॉइश्‍चराइजिंग या तीन गोष्टी रोज न चुकता करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com