सोशल मीडियावरचं गाजलेलं... (किरण माने)

किरण माने kiranmane7777@gmail.com
रविवार, 16 एप्रिल 2017

‘रिक्षा’वाली बाई

‘‘अ  हो, आजपर्यंत मी कधीच कुठल्याच महिलेला रिक्षा चालवायचा परवाना दिला नाही. तुम्हाला कसा देऊ?’’ आरटीओ साहेब बुचकळ्यात पडले होते...!
रेखा गाडगे हसली आणि म्हणाली, ‘‘अहो, काय यवढा विचार करताय सायेब...बायका विमानं चालवायला लागल्या आता. ही तर साधी रिक्षाय. हातात गिअर! देऊन टाका लायसन.’’

‘रिक्षा’वाली बाई

‘‘अ  हो, आजपर्यंत मी कधीच कुठल्याच महिलेला रिक्षा चालवायचा परवाना दिला नाही. तुम्हाला कसा देऊ?’’ आरटीओ साहेब बुचकळ्यात पडले होते...!
रेखा गाडगे हसली आणि म्हणाली, ‘‘अहो, काय यवढा विचार करताय सायेब...बायका विमानं चालवायला लागल्या आता. ही तर साधी रिक्षाय. हातात गिअर! देऊन टाका लायसन.’’

...‘माझ्या नवऱ्याची बायको’च्या आऊटडोअर शूटिंगच्या वेळी सेटवरून लोकेशनवर जाण्यासाठी मी रिक्षात बसलो आणि चकित झालो. रिक्षा चक्क एक मुलगी चालवत होती आणि जास्त सफाईदारपणे ठाण्यातल्या ट्रॅफिकमधून मार्ग काढत होती...
तिच्याशी बोलताना मला विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे ‘घरची परिस्थिती वाईट’, ’सगळी जबाबदारी माझ्यावरच’, ’रिक्षा चालवून कशीबशी घरचा गाडा ओढते,’ अशी कुठलीही करूण कहाणी तिनं ऐकवली नाही! अतिशय हसतमुख, बडबडी आणि एनर्जेटिक. तिनं बीकॉम करून ड्राफ्ट्‌समनचा कोर्स केलाय आणि मुंबई महापालिकेच्या जकात विभागात ती नोकरीही करते...तिचा भाऊ बीएआरसीमध्ये नोकरीला आहे. वडील नोकरीतून रिटायर्ड झाले आहेत.
केवळ ‘वेगळं’ काही तरी करायचं या जिद्दीनं ती सकाळी नऊ ते एक रिक्षाचा व्यवसाय करते आणि नंतर ऑफिसला जाते!
‘‘हे बगा सायेब, एवढं शिकून नोकरी करून कुणी माझी एवढी दखल घेतली असती का? पेपरात, टीव्हीवर माझ्या मुलाखती आल्या असत्या का? मग आज माझं हे धाडस बगून, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात, वेगळं काम करून दाखवायची हिंमत चार पोरींच्यात आली तरी लै झालं मला!’’

ती आमच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ सिरीयलची फॅन आहे. तिनं माझ्याबरोबर फोटोही काढले. मी म्हटलं, ‘‘थांब. आता मला तुझ्याबरोबर फोटो काढायचाय. तू ‘खरी’ सेलिब्रिटी आहेस.’’ ती खूप हसली. तिथंच दूर उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडं पाहून म्हणाली ‘‘ते चेक्‍स शर्टवाले कोण आहेत?’’ मी सांगितलं, ‘‘अगं ते आमचे दिग्दर्शक आहेत केदार वैद्य!’’ तशी ती ओरडून त्यांना म्हणाली, ‘‘सर, मला एका सीनमध्ये रिक्षा चालवताना दाखवा बरं का!’’ त्यांनीही हसून ‘‘नक्की!’’ असं उत्तर दिलं...ती लगेच उत्साहानं म्हणाली, ‘‘आता तुम्हाला सेटवर सोडून चांगला मस्त ड्रेस घालून येते!’’
चार मुलींना ‘हिंमत मिळावी’ या भावनेनं वेगळं काम ’पॅशन’ म्हणून करणाऱ्या रेखाला मनोमन सलाम केला!

Web Title: social media article write on kiran mane in saptarang