सोशल मीडियावरचं गाजलेलं... (प्रशांत कुलकर्णी)

प्रशांत कुलकर्णी (९८६००२६४९९) kulpra123@gmail.com
रविवार, 19 मार्च 2017

वाढदिवस ः हौस की शिक्षा?
माझी ही पोस्ट बहुदा कदाचित काही लोकांना आवडणार नाही...पण मुद्दा समजून घ्या...बाकी हट्टाहास काही नाही...
तर विषय असा आहे की...
एक ते सहा वयोगटातील मुलांचे वाढदिवस हे एखादा हॉल बुक करून अनेक लोकांना बोलावून उगाच पैशाची उधळपट्टी करत साजरा करण्यास माझा तीव्र विरोध आहे.
म्हणजे बघा, या वयोगटातील मुलांना जराही समज नसते...ज्यांच्यासाठी आपण ‘तामझाम’ करून एवढे पैसे खर्च करून त्याचा वाढदिवस साजरा करणार असतो, त्याला त्याची जाणीवही नसते आणि मोठेपणी त्याच्या ते काही लक्षातही राहणार नसते...

उलट त्याच्या दृष्टीने विचार करता, तो दिवस त्याला जाचकच होतो...एक तर त्याच्यावर त्या दिवशी बरीच बंधने येतात...मोकळेढाकळेपणा जातो....रोजच्या सगळ्या सवयी मोडतात...खाण्यापिण्याच्या, झोपण्याच्या...उगाच त्याच्या अंगावर केवळ आपल्या हौसेखातार भपकेबाज कपडे घालतो, ज्याचं त्याला काहीही अप्रूप नसतं.... उलट त्याला ते त्रासदायकच असतं...

बरं, त्या कार्यक्रमाचे ते तीन-चार तास म्हणजे त्याच्यासाठी शिक्षा...कळत काही नसतं; पण उगाच याच्या-त्याच्या कडेवर भटकावं लागतं...कोणी पाप्या घेतं...मुका घेतं...वर-खाली करतं...त्याच्या स्वातंत्र्यावर ही गदाच नाही का? बरं, त्या कार्यक्रमाला जो मेनू असतो तो त्याच्या काही कामाचा नाही...त्यातला एकही पदार्थ यथेच्छ तो चाखू शकत नाही...

म्हणजे एकूण काय तर, वाढदिवस त्याचा हे केवळ एक निमित्त...त्यामागे एक तर आपली आपण हौस भागवून घेत असतो किंवा आपण आणखी एक कारण पुढे करतो...आमच्याकडे बरेच दिवसांत काही कार्यक्रम नाही झाला म्हणून हे निमित्त...
मला हे काही पटत नाही...
बरं येणारा माझ्यासारखा पाहुणा थोडं-फार कौतुक करतो. गप्पा मारतो आणि यथेच्छ खाऊन-पिऊन जातो.
आणि यात खर्च होतात...हजारो रुपये...

मी म्हणतो त्यापेक्षा असे वाढदिवस घरातल्या घरात साजरे करावेत. त्याच्या सुखसोयीच्या आणि आपला भार हलका करणाऱ्या वस्तू त्यांच्यासाठी घ्याव्यात... आणि हेच वाचलेले पैसे त्याच्या नावावर बॅंकेत ठेवावेत. सलग चार-सहा वर्षांत असे बऱ्यापैकी पैसे जमा होतील...

त्यातलेच काही पैसे खर्च करून करावा; मग असा एक झकास वाढदिवस...तोपर्यंत त्याचीही ‘मेमरी’ चांगली विकसित झालेली असते...त्यालाही अशा वाढदिवसाचे आकर्षण असते...त्याच्या वयोगटाचे मित्र-मैत्रिणी येतात आणि मग तोही एंजॉय करतो. बाकीचे पैसे त्याच्याच काही हौसे-मौजेखातर पुढे-मागे खर्च करावेत...
बघा पटतंय का...
हा फक्त एक विचार...
कुलकर्ण्यांचा ‘व्यवहार्य तारतम्यी’ प्रशांत

Web Title: social media article write on prashant kulkarni

टॅग्स