Solo Performance Art Marathi : एकटा कलाकार, अनेकांचा आवाज; बहुकलारूपसिद्धी, परफॉर्मन्स आर्ट आणि एकलनाट्याची बंडखोर परंपरा

One Man Show Acting Techniques : एकलनाट्य म्हणजे केवळ एकट्याचे भाषण नसून ती एक अखंड साधना आहे; 'वऱ्हाड'पासून 'कुसूर'पर्यंतच्या प्रवासात दडलेली रंगमंचीय आव्हाने आणि या कलेचे सामाजिक व तांत्रिक महत्त्व यावर विशेष प्रकाश टाकणारा हा सविस्तर लेख.
Solo Performance Art Marathi

Solo Performance Art Marathi

esakal

Updated on

आशुतोष पोतदार- potdar.ashutosh@gmail.com

काही वेळा एकलनाट्य केवळ एकट्याचं बोलणं उरत नाही- ते अनेकांचं सांगणं होतं. असे कलाकार स्वतःच्या आवाजातून बहु-जनांच्या भाव-भावना मांडतात. सादरीकरणामागची त्यांची प्रेरणा असते ती जनसामान्यांच्या आवाजाला रंगमंचीय रूप देण्याची. व्यवस्थेशी थेट भिडण्याचं ते माध्यम बनतं - कधी निषेध, कधी घोषणा, कधी निव्वळ उपस्थिती जी बहुसंख्यकांना आणि राजसत्तेलाही नाकारता येत नाही. इथेच ‘परफॉर्मिंग आर्टस्’ आणि ‘परफॉर्मन्स आर्ट’ यातला फरक महत्त्वाचा ठरतो.

नव्वदीच्या दशकात प्रा. लक्ष्मण देशपांडेंचं ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ म्हणजे करमणूक असायची. त्यांची नक्कल करत कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये किंवा घरगुती कार्यक्रमात कुणीही खांद्यावर पंचा घेतला की रंगमंच तयार व्हायचा. दहा-बारा मिनिटांत एकटा कलाकार ‘वऱ्हाड’ मधले मराठी समाज, कुटुंब आणि भाषेचे विविध पदर असे काही उलगडायचा की एकट्याने कशाला नाटक करतोस असं विचारण्याची कुणाला हिम्मतच नसायची.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com