Father's Day : वडिलांनी मुलांना आणि मुलांनी वडिलांना सांगायच्या गोष्टी 

टीम ईसकाळ
Sunday, 16 June 2019

प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या भविषयासाठी आयुष्यभर झटत असतात. मुलांना खूप कष्ट पडू नयेत म्हणून ते कामात स्वतःला झोकून देतात. भारतासह जगात सगळीकडे वडील आपली जबाबदारी पार पाडत जगाला सामोरं जाण्यासाठी मुलांना स्वतःच्या पायावर उभं करतात.

फादर्स डे : प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या भविषयासाठी आयुष्यभर झटत असतात. मुलांना खूप कष्ट पडू नयेत म्हणून ते कामात स्वतःला झोकून देतात. भारतासह जगात सगळीकडे वडील आपली जबाबदारी पार पाडत जगाला सामोरं जाण्यासाठी मुलांना स्वतःच्या पायावर उभं करतात. अमेरिकेसारख्या देशांमध्ये मुलगा १८ वर्षांचा झाला की तो लगेचच स्वतःच्या पायावर उभं राहून पूर्णतः स्वबळावर आर्थिक गरज पूर्ण करतो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सुरवात करतो. 

मुलाला आवर्जुन सांगा
आपल्याकडे अजूनही मुलगा मोठा झाला तरी त्याच्या प्राथमिक गरजांवर लक्ष दिले जाते. मात्र मुलांचे आर्थिक, सामाजिक, भावनिक संरक्षण आणि विकास याकडे दुर्लक्ष केले होते. बऱ्याचदा घरातील निर्णय हे मुलांसमोर घेतले जात नाहीत किंवा मुलांना त्यापासून दूर ठेवले जाते. किंवा ‘हे फक्त घरातील मोठ्या लोकांसाठी आहे, त्यांना अधिक समजते. तसेच बऱ्याचदा मुलांच्या त्यांच्या बाबतीतील निर्णयामध्ये बोलू दिले जात नाही.  कारण तुझे बरे वाईट तुला कळणार नाही वगैरे. त्यातूनच आपण मुलांना मागे ढकलत जातो. निर्णय क्षमतेवर परिणाम होत जातो. 

 आर्थिक निर्णय मुलांसोबत घ्या
बऱ्याच घरांमध्ये आपण बघतो की वडील मुलासमोर आर्थिक व्यवहार बोलत नाहीत किंवा लहानपणी मुलाला पैशांपासून दूर ठेवले जाते. म्हणजे आर्थिक व्यवहार करू दिले जात नाही. मात्र पैशाची कशाप्रकारे बचत केली पाहिजे. त्याचे पैशाचे मूल्य म्हणजेच बचत, संवर्धन करण्याची कशी गरज आहे याचे शिक्षण त्यांना देणे आवश्यक आहे. 'प्रॅक्टिकल नॉलेज' म्हणजेच कृतिशील शिक्षणपद्धतीचा अवलंब शिकवणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातील आर्थिक निर्णय आणि व्यवहार याचा संबंध मुलांना समजावून सांगितला पाहिजे. 

भारतीय कुटुंबांमध्ये आर्थिक नियोजनाबद्दल मुलांसमवेत कधीच बोलले जात नाही. कितीतरी कुटुंबे आर्थिक शिक्षणापासून बरेच दूर आहेत. शिवाय शालेय पद्धतीत आर्थिक नियोजनाच्या अभ्यासाचा अभाव आहे.  

उद्यमशीलता जोपासा
मुलांमध्ये उद्योग कौशल्य विकसित व्हावे या दृष्टीकोनातून प्रयत्न करायला हवेत. मुलांना लहानपणापासून योग्य ती माहिती आणि कौशल्य मिळवून निर्णय घेता यावेत यासाठी उद्यमशीलता विकसित केली पाहिजे. मुलांची बलस्थाने काय, मर्यादा काय याची जाण मुलांना होऊ देणे गरजेचे आहे. वेगवेगळी माध्यमे वापरत मुलांना स्वत:ची ओळख करून देण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणार्‍या वास्तवाची जाण वाढवली जेणेकरून मुलांना दिली गेली पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special article on Fathers day