फिटनेससाठी स्वीमिंग महत्त्वाचं!

riva
riva

स्लिम फिट : गायिका  रिवा राठोड

मी एक गायिक आहे. त्यामुळं कोणते पदार्थ खायला पाहिजेत किंवा कोणते खाऊ नयेत, यावर आपोआपच बंधन येतात. मी फिटनेसप्रेमी आहे, हेही तितकंच खरं. नेहमी संगीताच्या रियाजाबरोबरच मी व्यायामही करते. मी जिममध्ये जात नाही, पण माझा पर्सनल ट्रेनर आहे. मी रोज एक तास व्यायाम करते. मी खूप फुडी आहे. वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखण्यास मला आवडतं. पण, त्यालाही काही मर्यादा आहेत. मी खाते, पण माझं माझ्या खाण्यावर नियंत्रण आहे. आठवड्यातील दोन दिवस तरी माझं बाहेर खाणं होतं, पण त्यानंतर मी तेवढाच व्यायामही करते. फक्त व्यायामच नव्हे, तर आठवड्यातून एकदा मी स्वीमिंग करते.

फिटनेसच्या दृष्टीनं स्वीमिंग फार महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यामुळं अधिक फिट राहता. शिवाय दिवसातून वेळ मिळेल तसं मी धावायलाही जाते. यामुळं फक्त मी शरीरानंच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही फिट राहते. थकवा दूर होतो, नव्या गोष्टी करण्यास ऊर्जा मिळते आणि संगीताचा रियाज करण्यास आणखी प्रेरणा मिळते. जंक फूड, कोल्ड्रिंक आणि बाजारात मिळणारे पॅकबंद पदार्थ मी खात नाही. लहानपणापासूनच बाजारातील पॅकबंद पदार्थ खाण्याची मला फार आवड होती, पण आता मी पूर्ण बंद केलं आहे. गायक असल्यामुळं या सगळ्या गोष्टींवर बारकाईनं लक्ष द्यावंच लागतं. खरं तर मला शारीरिक, मानसिक फिटनेसबरोबर आवाजाच्या फिटनेसकडंही विशेष लक्ष द्यावं लागतं. ताज्या फळांचा ज्यूस मी जास्त पिते. शिवाय ग्रीन टी सोबतीला आहेच.

जेवणही अगदी साधं आणि घरगुती. मी नेहमी ताज्या भाज्यांचा सूपही पिते. मी तीन वर्षांची असतानाच गायनाला सुरवात केली. माझे वडील रूपकुमार राठोड यांना पाहूनच माझ्यामध्ये संगीताची गोडी निर्माण झाली. मधुर आवाजासाठी फक्त रियाजच नव्हे, तर खाण्या-पिण्यावरही बंधन येतात, हे हळूहळू समजत गेलं. तिखट पदार्थ मी बिलकूल खात नाही. माझं डाएट म्हणून वेगळं प्लॅनिंग नाही. सकाळचा नाश्‍ता, दोन वेळा जेवण ठरलेलं असतं. चपातीपासून मी दूरच राहते. माझ्या जेवणात भाताचा समावेश असतो. मला मांसाहारी पदार्थ खूप आवडतात. माझी आई शाकाहारी आहे. त्यामुळं आमच्या घरी मांसाहारी पदार्थ बनत नाहीत. पण, माझे इतर मित्र-मंडळी आहेत ते माझ्यासाठी त्यांच्या घरी बनवलेले मांसाहारी पदार्थ घेऊन येतात. घरगुती पदार्थ खाण्याकडं माझा अधिक कल असतो. शरीर आणि मनानं फिट राहिलं, की माझा दिवसही तितकाच चांगला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com