घ्या उंच भरारी!

कोंबडी म्हणाली, ‘‘ तुझ्याही पंखात झेप घेण्याचं बळ आहे. तू ही भरारी घेऊन बघं!’’
Take a leap
Take a leapsakal

एकदा कोंबडीच्या पिलात घारीचं पिल्लू पडलं. पुढे त्या पिल्लानं कोंबडीलाच आपली आई मानलं. तिच्या पिल्लांबरोबर ते राहू लागलं. असे अनेक दिवस उलटून गेले. घारीचं पिल्लू मोठ होत होतं. एक दिवस त्या पिल्लाचं आकाशाकडे लक्ष गेलं असता, ते आईला म्हणालं,‘‘ आकाशात जो पक्षी मुक्त संचार करीत आहे. तसं आपल्याला उडता आलं तर !’’कोंबडी म्हणाली, ‘‘ तुझ्याही पंखात झेप घेण्याचं बळ आहे. तू ही भरारी घेऊन बघं!’’

Take a leap
खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

हळुहळू ते पिल्लू पंख उघडू लागलं. छपरावरून पुढे त्यानं एकदा उंच भरारी घेतली. जर का त्या आईने घारीच्या पिलाला सल्ला दिला नसता. त्यांच्या पंखातील बळाची ताकद ओळखली नसती तर ते पिल्लू कोठे असते.मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं कारण असं की, प्रत्येकाच्या पंखात बळ असतं. त्याचा उपयोग करून कसा घ्यायचा, हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. आज जग खूप पुढे जात आहे. नवनवीन गोष्टी आपल्यापुढे उभ्या आहेत.

स्पर्धा परीक्षा असो, की राजकारण, शिक्षण, समाजकारण युवा तेथे नाहीत असं नाही. जर प्रामाणिक कष्ट केले. अपयश आलं तरी जे डगमगत नाहीत, त्यांना यश नक्कीच मिळतं. आपली स्वत:ची क्षमता ओळखली पाहिजे. शिवाय आपल्याला कशात रूची आहे हे ही पाहणं महत्त्वाचं असतं.जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रातच करिअर करण्याचा एकदा जर निर्णय झाला आणि त्यासाठी तयारी सुरू केली तर यश लांब नसतं. झटपट यश मिळेल असे नव्हे. थोडा वेळही जाईल. आवडीचं क्षेत्र मिळालं की माणूस त्यामध्ये जीव ओतून काम करत असतो.

Take a leap
अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

शहरापेक्षा गावाकडंची पोरं-पोरी लाजरीबुजरी असतात. त्यांना फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही. त्यामुळे ती मागे पडतात असं एकेकाळी म्हटलं जायचं. मात्र, आज तसं चित्र मुळीच दिसत नाही. येथे मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्र्वास नांगरे-पाटील नेहमीच म्हणतात, की खेड्यातील मुल ही रानफुलासारखी असतात. त्यांना जर चांगलं खतपाणी घातलं. काळी कसदार जमीन मिळाली तर ती अशी रूजतात, फुलतात, कसदार होतात.

मोठ्या शहरातील गुलाब, कमळ, मोगराही त्तयांच्यासमोर फिका पडतो. हे सगळं खरं असलं तरी सगळीच तरूणाई कष्ट करायला कुठे कमी पडत नाही, पडणार नाही असं वाटतं. प्रत्येकाच्या पंखात बळ असतं. भरारी घ्यायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं !

- मुक्ता आपेगांवकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com