Traditional Indian Mango Varieties : रायवळच्या गंधाळलेल्या परिमळात हरवलेलं बालपण; आज्जीची टोपली, उन्हाळा आणि आंब्यांच्या आठवणी

Childhood Summer Vacation Memories India : रस्त्याकडेला टोपलीत आंबे विकणाऱ्या आज्जीबाईंनी हातावर दिलेल्या रायवळ आंब्याच्या रसाने बालपणाच्या सोनेरी आठवणींना उजाळा दिला. कल्याणमधील सायकलचे हुंडदणे, दुपारचे खेळ आणि हापूसच्या हंगामातील 'पॉकेटमनी'चा तो काळ मनाला सुखावून जातो.
Traditional Indian Mango Varieties

Traditional Indian Mango Varieties

esakal

Updated on

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

आमच्या घरी आंबे जास्त करून असायचे ते तोतापुरी, रायवळ म्हणजे चोखायचे आंबे किंवा बिट्टी आंबे आणि पायरी. रायवळच जास्त. बाबा पायरी आणायचे. त्यांना त्याचा रस आवडायचा. तोतापुरी मेच्या शेवटाला, पाऊस सुरू झाला की यायचा. कधी कधी आई बदामी आंबा आणायची. पण त्याचा रस मला तितका आवडायचा नाही, पण आंब्याला नाही म्हणायचं नाही, हा नियम मी कटाक्षाने पाळायचो. लहानपणी मी फार क्वचितच हापूस खाल्ल्याचं मला आठवतं.

रस्त्याकडेला टोपलीत आंबे घेऊन बसलेल्या आज्जीबाई दिसल्या. नकळत तिकडे पावलं वळली. ते आंबे काही पायरी, हापूस किंवा केसर असे ‘उच्चभ्रू’ नव्हते. साधे, ज्याला आम्ही लहानपणी रायवळ म्हणायचो ते होते. लांबुडके, हिरवे-पिवळे आणि मऊ, पिकलेले... मधुर वासाचे.

मी विचारलं, ‘कसे दिले आज्जी?’

आज्जीने सॅम्पल ठेवलेला आंबा पिळून, चवीला रस माझ्या हातावर दिला आणि म्हणाली, ‘पोरा, चव बग. माज्या दारचा आंबा हाय. एकदम ग्योड.’ त्या गोड चवीने, गंधाने मन हरखून गेलं, थेट बालपणात शिरलं...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com