Trump Declassifies Hidden UFO Files : आकाशातील गूढ की लष्करी गुपिते? ट्रम्प यांनी अखेर उघडला अतिगोपनीय यूएफओ फायलींचा खजिना!

Secret UFO Documents Released by US Government : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक आदेशानंतर अमेरिकेने यूएफओ (UFO) संदर्भातील १६० अतिगोपनीय फायलींचा खजिना जाहीर केला असून, १९४० पासूनच्या लष्करी गुपितांचा उलगडा झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.
Trump Declassifies Hidden UFO Files

Trump Declassifies Hidden UFO Files

esakal

Updated on

हर्ष काबरा - saptrang@esakal.com

आकाशातील गूढ की लष्करी गुपिते ? निवडणूक आश्वासन की राजकीय खेळी ? ट्रम्प यांनी दशकांपासून दडवलेला यूएफओ फायलींचा खजिना जगासमोर आणला आहे आणि ही केवळ सुरुवात आहे, पण यामुळे मानवी तर्क आणि विज्ञानाच्या सीमेवर उभी ठाकलेली अनाकलनीय, आदिम अस्वस्थता पुन्हा एकदा उफाळून आली आहे.

पृथ्वीवर दिशा हरवली की माणूस आकाशाकडे पाहतो, पण तिथले अथांग गूढ त्याला पुन्हा संभ्रमाच्या भूलभुलैयातच ढकलून देते. कधी रडारला जे दिसत नाही ते वैमानिक पाहतात, तर कधी वैमानिकांच्या नजरेतून सुटलेले रडार टिपते. कधीकधी दोघांनाही काहीच दिसत नाही, तरीही तिथे काहीतरी असल्याची भावना पिच्छा सोडत नाही. मानवी आकलनापलीकडच्या अशा घटनांमुळे कधी अमेरिकेत सिनेटच्या सुनावण्या पार पडतात तर कधी भारतात लढाऊ विमाने आकाशात झेपावतात. या घटनांच्या अधिकृत नोंदी असल्या तरी त्यांचे शास्त्रीय खुलासे मात्र गुलदस्त्यातच असतात.

पूर्वी ज्यांना ‘अज्ञात उडत्या वस्तू’ (Unidentified Flying Object - UFO) म्हटले जाई, त्यांना आता ''अनाकलनीय विसंगत घटना'' (Unidentified Anomalous Phenomena - UAP) असे नाव मिळाले आहे. आधुनिक उड्डाण क्षेत्रातील हे न सुटलेले कोडे मानवी तर्काला आव्हान देत असते. संज्ञा नवी असली, तरी त्यामागची अस्वस्थता मात्र आदिम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेने ''यूएफओ'' संदर्भातील १६० अतिगोपनीय फायलींचा खजिना नुकताच सार्वजनिक केला. दशकांपासून दडवून ठेवलेल्या आकाशातील अनाकलनीय घटनांचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा उलगडा. यात १९४० पासूनचे लष्करी अहवाल, नासा आणि एफबीआयची कागदपत्रे, वैमानिकांचे अनुभव आणि काही दुर्मीळ फोटोंचा समावेश आहे. पारदर्शकतेचा हा नवा अध्याय ट्रम्प यांच्या निवडणूक आश्वासनांपैकी एक होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com